टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूरकडे कांदा घेऊन जाणारा आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन कार चालवत असलेले बार्शीचे युवा उद्योजक सागर जयेश कोठारी गंभीर जखमी होऊन ठार झाले. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
बार्शी तालुक्यातील कुसळंब येथून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आयशर टेम्पो (MH 48 AR 5858) सोलापूरकडे जात होता. राळेरास येथील वनविभागाजवळ टेम्पो येताच बार्शी येथील कोठारी गॅस एजन्सीचे मालक सागर कोठारी हे सोलापूरहून बार्शीकडे (MH 13 K 9909) स्वतः कार चालवत बार्शीकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोठरी त्यांच्या कारची समोरची बाजू पूर्णपणे चमटून रोडच्या बाजूला गेली. त्यात सागर कोठारी यांचा जागीच मृत्यू झाला.
याच रस्त्यावर फक्त तीनशे मीटर अंतरावर केवळ अर्ध्या तासापूर्वीच एका उसाच्या ट्रॅक्टरचा आणि कारचा अपघात झाला होता.







