news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कायदे विषयक शिबिर संपन्न ; न्यायाधीश एस. एन. गंगवाल-शाह यांची प्रमुख उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
September 22, 2024
in ताज्या घडामोडी
0
मंगळवेढ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कायदे विषयक शिबिर संपन्न ; न्यायाधीश एस. एन. गंगवाल-शाह यांची प्रमुख उपस्थिती

 

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे वार्षिक दिनदर्शिकेप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर एम. एस. आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यू. पी. देवर्षी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक संघ मंगळवेढा येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरीकांचे हक्क व ज्येष्ठ नागरीकांचे विविध कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्रीधर भोसले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने यांनी केले. त्यांनी मृत्यृपत्राबाबत, ज्येष्ठ नागरीकांनी आपली व आपल्या मालमत्तेची कशी काळजी घ्यावी तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी उपलब्ध असलेल्या पोटगीच्या तरतुदीची माहिती दिली.

ॲड. एस. आर. पवार यांनी ज्येष्ठ नागरीक कायदा 2023, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, समस्या, मानवाधिकार, जगण्याचा अधिकार, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकिय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर भोसले यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यतिराज वाकळे यांनी केले तर तुकाराम आवताडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, व्ही. डी. मोरे, विधीज्ञ संघ मंगळवेढाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने, ॲड. एस. आर. पवार, ॲड. डी. एस. माने तसेच विठठल शिवशरण, सिध्देश्वर पटणशेटटी, पोपट महामुरे, शंकर इकारे, वसंत गुंड, नामदेव पोळ, प्रकाश स्वामी, दिलीप कोष्टी, श्रीमती. अजीता भोसले, श्रीमती. सुनंदा आवताडे यांचेसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरीक यांनी उपस्थित राहुन कायदेविषयक शिबीराचा लाभ घेतला.

Previous Post

सुवर्णयोग ! आज मंगळवेढ्यात अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचा ‘खरेदी दागिन्यांची ट्रीप दुबईची’ योजनेचा बक्षीस वितरण समारंभ व ग्राहक कृतज्ञता सोहळा ; महिलांसाठी रंगणार खेळ पैठणीचा

Next Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘इंजिनियर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा ; प्राचार्य तानाजी बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
शाब्बास पोरांनो ! उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'इंजिनियर्स डे' मोठ्या उत्साहात साजरा ; प्राचार्य तानाजी बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group