news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

टीम लोकमन by टीम लोकमन
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

टीम लोकमन जालना |

जालन्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दिनांक 22) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाफ्राबाद-जालना रोडवरील सावंगी-गोधनखेडा फाट्याजवळ घडली आहे. विनोद बाबुराव कळंबे (वय 44) असे या अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील विनोद कळंबे हे (MH21 BQ.9595) क्रमांकाच्या कारने टेंभुर्णीकडून जाफ्राबादकडे येत होते. तर रामेश्वर नामदेव पवार (वय 45) हे (MH28 EW 4326) क्रमांकाच्या कारने जाफ्राबादकडून देऊळगाव राजाकडे जात होते. सावंगी-गोधनखेडा फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झालेल्या विनोद कळंबे यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कळंबे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विनोद कळंबे हे जाफ्राबाद तालुक्यातील नळवीरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचे लहान भाऊ होते. दरम्यान या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

Next Post

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Next Post

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026
मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group