news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रूपाली चाकणकर यांना आदेश ; भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांच्या अडचणी वाढणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
March 20, 2026
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रूपाली चाकणकर यांना आदेश ; भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांच्या अडचणी वाढणार?

टीम लोकमन मुंबई |

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितले आहे. अशोक खरातला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले होते. ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड. रूपाली ठोंबरे या दोन्ही नेत्या चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना वर्षा  निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.

रुपाली चाकणकर यांची पोस्ट

याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही असा दावा त्यांनी केला आहे. आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

“आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले,” असे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

Previous Post

नारीशक्तीचा सन्मान ! मंगळवेढ्यात लोकमंगल बँकेच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात ; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा झाला गौरव

Next Post

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी, SIT च्या संशयाची सुई आता राजकीय नेत्यांकडे ; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील बडा मासा गळाला लागणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group