news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत : सोनियाताई जयकुमार गोरे, मातृशक्ती आणि दुर्गाशक्ती पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात साजरा

टीम लोकमन by टीम लोकमन
March 18, 2026
in सामाजिक
0
स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत : सोनियाताई जयकुमार गोरे, मातृशक्ती आणि दुर्गाशक्ती पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात साजरा

 

टीम लोकमन सांगोला |

जिथे स्त्रियांचा सन्मान करण्यात येतो तिथे देवता वास करतात. स्त्रियांची शक्ती महान असून ज्यांनी त्यांची पूजा केली त्यांच्या ताब्यात या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र दिला. समाज परिवर्तनाचा खरा वारसा आजपर्यंत स्त्रियांनीच जपला असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याचे पवित्र कार्य अनिलभाऊ इंगवले साहेबांचे नेतृत्वाखाली हा सूर्योदय परिवार करत आहे. आपले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून सबंध महाराष्ट्रासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणी सदस्या तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांनी व्यक्त केले.

अनिलभाऊ इंगवले आणि त्यांच्या चार मित्रांनी अनेक प्रकारचे उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली असून कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक ऋण व्यक्त करण्याची भावना मनात ठेवून अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणाऱ्या सूर्योदय परिवाराच्या सर्व प्रकारच्या व्यवसायाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ कायम राहील. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मंचावर रुपमती दीपक साळुंखे-पाटील, नूतन सभापती पूनम इंगवले, पंचायत समितीच्या सदस्या राणीताई पाटील, नगरसेविका सुजाता केदार, सुप्रिया इंगवले तसेच सूर्योदय अर्बनच्या व्हा. चेअरमन ज्योतीताई भगत, संचालिका मीनाक्षीताई दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन अर्चनाताई इंगवले यांनी आपल्या प्रास्ताविकात सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेले विविध उपक्रमांची माहिती आणि जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत उत्तुंग कर्तुत्व असलेल्या अनेक महिलांना पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आमच्या सूर्योदय फाउंडेशनची उंची खर तर अशा पुरस्कारामुळे आणखी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी एलकेपी मल्टीस्टेटच्या संचालिका सुरेखाताई लवटे, रुपमती साळुंखे-पाटील, सभापती पुनम इंगवले तसेच हभप पांडुरंग ताटे, पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने सांगोला महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, माता बालक प्रतिष्ठानच्या प्रमुख संजीवनी केळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या समाजभूषण सखुबाई वाघमारे इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त करताना एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय महिला अर्बन, सूर्योदय अर्बन तसेच सूर्योदय दूध विभाग आणि सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतन अशा व्यवसायाच्या आणि संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यात आपल्या कर्तुत्वाची भरारी घेत असताना दुसऱ्या बाजूला व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य उभा करत महिला दिन सारखे अत्यंत देखने कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे विशेष कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्रातील नामवंत हास्यसम्राट आणि या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते संभाजी यादव यांनी अत्यंत विनोदी शैलीत सर्वांना संस्काराचे धडे दिले. विविध वाद्यांचे, प्राण्यांचे, चित्रपटातील अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढत सुमारे तासभर उपस्थितांची हसता हसता अक्षरशः पुरेवाट केली. दोन्ही पायांनी पूर्णतः अपंग असताना देखील समाजातील सूक्ष्म गोष्टींचे निरीक्षण करून केलेले जीवनोपयोगी प्रबोधन सर्वांच्या मनाला भावले. चूल आणि मुले याच्या पलीकडे जाऊन आकाशाला गवसणी घालणारे कर्तुत्व गाजवणाऱ्या रणरागिनी महिलांना दुर्गाशक्ती आणि बलशाली भारताच्या विकासात मोलाचे योगदान देणारी पिढी निर्माण करणाऱ्या आदर्श मातांना मातृशक्ती या पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले.

यामध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून व्यापक कार्य करणाऱ्या सौ संजीवनी केळकर, महिला सूत गिरणीच्या विद्यमान चेअरमन आणि माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई शिंगाडे, महिला सूतगिरणीच्या जवळपास तीन तपे चेअरमन पद भूषवणाऱ्या श्रीमती विमलताई कुमठेकर, सुमारे 55 वर्षापासून कठीण परिस्थितीशी झगडत व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त सखुबाई वाघमारे, महिलांच्या संवेदना आणि व्यथा समाजासमोर मांडत सातत्याने प्रबोधन करणाऱ्या सुवर्णाताई इंगवले, पुढच्या अखंड पिढीला शिक्षणाने सुजाण आणि सुशिक्षित करून त्यांच्याकडून व्यापक कार्य उभा करणाऱ्या आदर्श माता श्रीमती निर्मला रामदास भोसले, तसेच श्रीमती उर्मिला विनायक इंगवले, संजीवनी अविनाश माने, मंगल एसाप्पा माने, स्नेहा धनंजय डोंगरे, नीता मोहनराव पवार, सिंधुताई मोहन कोळी, श्रीमती सोनाली शत्रुघ्न माळी, श्रीमती स्वप्नाली प्रमोद भगत, जनाबाई धोंडीबा थोरबोले, मेघाली सिताराम काकडे, समाबाई मल्हारी लवटे, मनीषा जगन्नाथ कसगावडे, दमयंती दत्तात्रय पाटील, वैशाली बाळासाहेब भोसले, श्रीमती वंदना शरदचंद्र पाटणे, सुनंदा कुंडलिक खांडेकर, बेबीनंदा दगडू पवार, अरुणादेवी अमरसिंह देशमुख, सुनिता विष्णू बोंगे, नेहा मिलिंद श्रोत्री, मनीषा शिवाजी नागणे, अंजली हर्षल बनसोडे, सुनीता बाळासाहेब वाघमोडे, श्रद्धा नवनाथ सपाटे, सुवर्णा दत्तात्रय शेडसाळे, अमृता अरविंद कुलकर्णी, सखुबाई भारत हेंबाडे, ताराबाई बळीराम शिंदे, चंद्रभागा रामदास घाडगे, वर्षाराणी गणपत मोरे, रत्नमाला संभाजी कदम, सखुबाई बाळासाहेब सावंत, रेखा आबासो माने, सुनीता शंकर मासाळ, कविता कृष्णा जानकर, विजया सदाशिव साळुंखे, स्मिता अमोल खंडागळे, लक्ष्मी अनिल कर्चे, निळाबाई वसंतराव पाटील, सुलभा बिरा वाघमोडे, अश्विनी सचिन लेंडवे, स्वाती ज्ञानेश्वर रोकडे, राणी प्रताप काळे आणि विद्या पांडुरंग ताटे इत्यादी रणरागिनींना सोनियाताई गोरे आणि मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, मायेची शान, सन्मानाची ट्रॉफी आणि मानपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक आणि एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले तसेच सह संस्थापक डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी, प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार गुरुजी, डॉ. शिवराज भोसले, प्रशांत पाटील, सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल काळुंगे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिलांची प्रचंड उपस्थिती, उत्कृष्ट आसन व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था आणि व्याख्यानाची मेजवानी यामुळे हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय झाला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

Previous Post

मोठी बातमी ! लाचेची रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; इको गाड्यांचे भाडे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

Next Post

मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

Next Post
मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026

मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

March 24, 2026
मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group