news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने कॉल व मेसेजला दिले नाही उत्तर ; पोलिसांनी नंबर ट्रॅक केला, घटनास्थळी पोहोचताच पोलीस अधीक्षकांसह पोलिसांनाही बसला धक्का

टीम लोकमन by टीम लोकमन
March 14, 2026
in क्राईम
0
धक्कादायक ! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने कॉल व मेसेजला दिले नाही उत्तर ; पोलिसांनी नंबर ट्रॅक केला, घटनास्थळी पोहोचताच पोलीस अधीक्षकांसह पोलिसांनाही बसला धक्का

टीम लोकमन सांगली |

मिरज येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला असून बाळू मुसा डांगे (वय 55, मूळ आरळा, ता. शिराळा, सध्या कुपवाड फाटा, सांगली) असे त्यांचे नाव आहे. काल दुपारपासूनच ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर मिरज पंढरपूर रोडवर तानंग फाटा येथे मोटारीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की अन्य कोणत्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सध्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळू डांगे यांची मिरज वाहतूक शाखेकडे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते प्रतिनियुक्तीवर मिरज पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कामकाजास होते. काल दुपारपासून कोणाच्याही संपर्कात नव्हते. कॉलही घेत नव्हते. त्यांचा मिरज शहरासह परिसरात शोध घेण्यात येत होता. डांगे यांचा संपर्क होत नसल्याने अखेर त्यांचे मोबाईल लोकेशन शोधण्यात आले. ते मिरज पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक व पोलिसही तानंग फाटा येथे गेले. तेथे मोटारीत ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण काल रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते. पोलिसही तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल संगीतातही अव्वल ; शास्त्रीय संगीत परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास कोरुलकर, उपाध्यक्षपदी डॉ. सुरेश काटकर, सचिवपदी डॉ. शरद शिर्के तर कोषाध्यक्षपदी डॉ. नंदकुमार शिंदे

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group