टीम लोकमन मंगळवेढा |
सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा मंगळवेढा व एलकेपी मल्टीस्टेट शाखा मंगळवेढा यांचेवतीने आज मंगळवेढा येथे बँकेचा वर्धापन दिन व मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूर्योदय परिवाराचे संस्थापक उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात व्यवसायवृद्धीने नावलौकिक प्राप्त केलेल्या एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने बँकेच्या वर्धापन दिन व मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कै. दादासाहेब नागणे कॉम्प्लेक्स मंगळवेढा येथे मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नामवंत उद्योजक व सूर्योदय परिवाराचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले व सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन अर्चना इंगवले यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणार आहे. तसेच एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन आणि सूर्योदय परिवारातील विविध उद्योगांचे प्रमुख व संचालक हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
सुप्रसिद्ध निवेदक भारत मुढे यांचा महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील होणार असून महिलांमध्ये या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. या कार्यक्रमातील सहभागी महिलांसाठी प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, तृतीय बक्षीस चांदीचा करंडा, चतुर्थ व पाचवे बक्षीस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच या हळदीकुंकू समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वच महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती सूर्योदय अर्बनच्या चेअरमन अर्चना इंगवले यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मंगळवेढा शाखेचे व्यवस्थापक महेश रोकडे व एलकेपी मल्टीस्टेटच्या मंगळवेढा शाखेचे व्यवस्थापक सिद्धेश गेजगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन परिवारातील कर्मचारी प्रयत्नशील आहेत.








