टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अभिजीत बने यांनी दिली.
बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावातील हनुमान मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवरील तज्ञ व नामवंत डॉक्टरांचा सल्ला, तपासणी व औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. बी एम फार्मा या कंपनीने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी (एमएमएस) हॉस्पिटल मंगळवेढा, ग्रामपंचायत शिरसी, लाईफस्टाईल ब्युटी पार्लर मंगळवेढा, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज मंगळवेढा यांच्या विशेष सहकार्याने हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होत आहे.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर ओंकार कुलकर्णी MD. Medicine फिजिशियन, डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर MBBS. D. Ortho, DNB अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश कोनळळी MBBS. DCH बालरोग व नवजात शिशु तज्ञ, डॉक्टर पुष्पांजली शिंदे MBBS. MD. OBGY. DNB स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ, डॉक्टर विजय नडगेरी MBBS, MS जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन, डॉक्टर स्मिता नडगेरी MBBS. DGO स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ, डॉक्टर अमित मेनकुदळे MBBS. DDV स्किन, हेअर व कॉस्मेटोलॉजिस्ट, डॉक्टर दीपेंद्र हुली MBBS. MS. ENT. कान नाक घसा तज्ञ, डॉक्टर स्वानंद महाजन BDS. MDS. (Orthodontist) Felloship in Advance Dentistry & Implatology डेंटल सर्जन हे सर्व नामवंत तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला व तपासणी करणार आहेत.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासोबत ब्लड शुगर, ब्लडप्रेशर व गरजेनुसार ECG मोफत करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना उपलब्ध औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. शिरसी येथील हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची नोंदणी बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी आणि ग्रामपंचायत शिरसी यांचेवतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची तयारी करण्यात आली आहे. रोटरी क्लब मंगळवेढा सिटी यांचेवतीने या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख म्हणून राखी जाधव व सहप्रकल्प प्रमुख म्हणून अमोल रत्नपारखी, असिफ मुल्ला, मल्लय्या स्वामी, उमेश मर्दा, रेवय्या हिरेमठ, विष्णू गोदे, चंगेजखान इनामदार, सोमनाथ इंगळे हे काम पाहत आहेत.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी शिरसी ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले असून सरपंच बाबासाहेब कसबे, उपसरपंच शहाजी औताडे, ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांचेसह ग्रामपंचायत सदस्य या शिबिराचे यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. शिरशी परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी कुलदीप रजपूत यांनी केले आहे.









