टीम लोकमन |
कर्नाटक राज्यातील हुबळी येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 13-14 वर्षांच्या 3 मुलांनी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली आहे. पीडित मुलीचे पालक बाहेर गेले होते. अत्याचार करणारी मुलेही अल्पवयीन असून पीडित मुलगी ज्या परिसरात राहते त्याच परिसरात ती मुलेही राहतात. या मुलांनी पीडितेला एका निर्जन स्थळी नेलं आणि तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार म्हणाले, 12-13 वर्षांच्या मुलीला संरक्षण देण्यात आले असून तिनही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोन विद्यार्थी हे शाळेत शिकत असून तिसऱ्या मुलाने शाळा सोडली आहे.
व्हिडिओ व्हायरल करण्याचीही दिली धमकी
धक्कादायक बाब म्हणजे, या मुलांनी पीडित मुलीला धमकावले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ असून ते व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकीही मुलांनी दिली होती. त्यामुळे त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात येणार आहेत.







