टीम लोकमन सोलापूर |
अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सोलापुरातील भैया चौक परिसरातील ईसीएस हॉस्पिटल तर्फे शनिवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता डफरीन चौकातील आयएमए हॉलमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी हृदयरोगाशी संबंधित जनजागृती प्रदर्शन व थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
या प्रदर्शन व प्रात्यक्षिकाचे उद्घाटन सोलापुरातील नामवंत उद्योजक व प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, ज्येष्ठ पत्रकार मनीष केत, आरएमईएचे चेअरमन नीलकंठ वाकचौरे यांचेहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार, डॉ. दीपक गायकवाड-पाटील, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्रगत हृदयविकार उपचार तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामग्री सोलापूरकरांना पाहता येणार आहे. तसेच एन्जोप्लास्टी म्हणजे नेमके काय? ती कशी केली जाते, टेन्ट कसा बसवतात, हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया कशी केली जाते, आर्टिफिशियल हार्ट म्हणजे काय, हृदय रोगावरील उपचारासाठी एआय चा वापर कसा होतो. याची माहिती नागरिकांना यावेळी देण्यात येणार आहे. तसेच प्रगत उपचार पद्धतीचे थेट प्रात्यक्षिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी सोलापूरकरांना उपलब्ध करण्यात आली आहे.
सध्या हृदयरुग्ण असलेले, यापूर्वी हृदयरोगावर उपचार घेतलेले नागरिक तसेच ज्याला स्वतःच्या आणि आपल्या जिवलगांच्या हृदयाची काळजी आहे. असा प्रत्येक जण या प्रदर्शनाला भेट देऊ शकतो. सोलापूरकरांनी ह्रदयरोगाबाबत पडणाऱ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे मिळवण्यासाठी या जनजागृती प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांना उपस्थित रहावे असे आवाहन एसीएस हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.









