news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलिसांचं नवं नेतृत्व ! वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते होणार राज्याचे नवे पोलीस महासंचालक

टीम लोकमन by टीम लोकमन
December 4, 2025
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र पोलिसांचं नवं नेतृत्व ! वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते होणार राज्याचे नवे पोलीस महासंचालक

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला 2 वर्षांचा वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपत असल्याने रिक्त होणाऱ्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. राज्यात सदानंद दाते हे सेवाज्येष्ठतेमध्ये वरिष्ठ असून त्यांच्याबरोबरच संजय वर्मा आणि रितेश कुमार हे आयपीएस अधिकारीदेखील पोलीस महासंचालकाच्या स्पर्धेत होते. परंतु केंद्र सरकारकडून दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते हे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

डॉ. सदानंद दाते हे कडक शिस्तीचे आणि कार्यतत्पर पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. डिसेंबर 2026 रोजी दाते सेवानिवृत्त होणार आहेत. दाते यांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना भरीव कामगिरी केली असून त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह आयुक्तपदाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली होती. ’26/11′ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्तपद त्यांनी भूषविले आहे. शिवाय आयटीबीपीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनदेखील दाते यांनी कामकाज पाहिले आहे.

Previous Post

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

Next Post

सांगण्याजोगे ! है अंधेरा फिर भी रोशनी की तू बात कर… लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर ; बेघर मनोरुग्ण आजीला दिला वारी परिवाराने हक्काचा निवारा

Next Post
सांगण्याजोगे ! है अंधेरा फिर भी रोशनी की तू बात कर… लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर ; बेघर मनोरुग्ण आजीला दिला वारी परिवाराने हक्काचा निवारा

सांगण्याजोगे ! है अंधेरा फिर भी रोशनी की तू बात कर... लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर ; बेघर मनोरुग्ण आजीला दिला वारी परिवाराने हक्काचा निवारा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group