news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

विविध उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर : अविनाश भारती, गुरुजनांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
September 21, 2025
in सामाजिक
0
विविध उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर : अविनाश भारती, गुरुजनांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

टीम लोकमन सांगोला |

जगातील अनेक देशांची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू असताना आपला भारत देश मात्र तरुणांचा देश म्हणून समोर येत आहे. या देशातील युवाशक्तीला योग्य मार्गाला वळवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रात एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला, सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग यासारख्या अनेक उद्योगातून युवकांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा हा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकी जपण्यात देखील त्याहूनही पुढे आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि कवी अविनाश भारती यांनी व्यक्त केले.

अनेक मजेदार परंतु चिंतनीय दाखले देत प्रत्येकाच्या जीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण असलेले महत्त्व त्यांनी विशद केले. सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा आणि सांगोला या चार तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींच्या विराट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिक्षकदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात “गुरु हाच खरा जीवनाचा शिल्पकार” या विषयावर ते बोलत होते. यावेळी उपस्थितांच्या आवडीची दखल घेत मधुर आवाजात अनेक कविता सादर करत आपल्या पहाडी आवाजातील मार्गदर्शनाने सर्व उपस्थितांना सुमारे दोन तास त्यांनी अक्षरशः खीळवून ठेवले.

यावेळी मंचावर सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, ब्रह्मा ग्रुपचे मारुती माळी, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत, एलकेपी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे, पांडुरंग ताटे, विनोद पाटील, प्रशांत पाटील तसेच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, व्हाइस चेअरमन सौ ज्योती भगत, संचालिका सौ सुरेखा लवटे, सौ मीनाक्षी दिघे, डॉ यशश्री इंगवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी प्रस्ताविकामध्ये एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन या संस्थांच्या यशस्वी वाटचाली बाबत माहिती सांगत सूर्योदय ग्रुपमधील अनेक उद्योग व्यवसाय आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम याबाबत माहिती सांगत व्यापक स्वरूपात केलेल्या वृक्ष लागवडी बाबत आणि त्याच्या संवर्धनासाठी शाळा स्तरावरती आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबद्दल सखोल माहिती सांगितली.

यावेळी सांगोल्याचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, ब्रह्मा ग्रुपचे संस्थापक मारुती माळी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत यांनी यावेळी बोलताना सूर्योदयचे विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगत सूर्योदय वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांसाठी तीन दिवसांकरिता दहा टक्के सवलतीची ऑफर सूर्योदयच्या वतीने घोषित केली. सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने शिक्षकदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने चार तालुक्यातील सुमारे 91 शिक्षक आणि 19 शाळांना यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व आदर्श शिक्षकांना आणि आदर्श शाळांना पुरस्कारांचे वितरण मंचावरून मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सूर्योदय ग्रुपचे देखणे आणि नेटके नियोजन, मन तृप्त करणारा वक्ता, आपुलकीने सेवा देणारा कर्मचारीवृंद आणि सूर्योदयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत झालेली सारस्वतांची अलोट गर्दी तसेच सर्वांसाठी केलेली स्नेहभजनाची उत्तम सोय यामुळे सन्मान गुरुजनांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

अनिलभाऊ इंगवलेंसह चार जिवलग मित्रांच्या मजबूत खांद्यावर उभ्या राहिलेल्या सूर्योदयच्या वतीने सामाजिक भान आणि कर्तव्याची जाण मनामध्ये ठेवून आम्हा गुरुजनांचा आपण सन्मान केलात. आखीव रेखीव नियोजन, नामवंत वक्ते, मनमिळावू स्टाफ सर्व काही उत्तम. सर्व काही पाहून डोळे, उत्कृष्ट भोजनाने मन आणि खूप काही ऐकून कान तृप्त झाले. धन्यवाद सूर्योदय परिवार. आपल्या उज्वल कार्यास शुभेच्छा..

प्रा. विनायक कलुबर्मे, आदर्श शिक्षक मंगळवेढा

कार्यक्रम कसा असावा. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सूर्योदय परिवाराचे कार्यक्रम. सूर्योदयाच्या प्रत्येक कार्यक्रमातून काहीतरी वेगळे पाहायला आणि ऐकायला मिळते. या शिक्षक दिन कार्यक्रमांमध्ये आदर्श शाळा आणि शिक्षकांची निवड अतिशय योग्य दिसून आली. आलेल्या प्रत्येक उपस्थितांना काहीतरी भरपूर पदरात पडल्याचं समाधान वाटत आहे. आमचे मन अगदी भरून आले.

सुवर्णा इंगवले, सह्याद्री शैक्षणिक संकुल सांगोला

Previous Post

वाहन चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य करू : पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे ; मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने चालक दिन साजरा, वाहन चालकांमध्ये उत्साह

Next Post

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group