टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा यावर्षीचा ३५ वा महोत्सव विविध सामाजिक उपक्रमातून साजरा होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अजित गोवे यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवा निमित्त दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि २२ सप्टेंबर रोजी सायं ७ वाजता सेवानिवृत्त मेजर गणपत महादेव मस्के यांच्या हस्ते प्रतिष्ठापणा होणार आहे दि २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता करुणा मतिमंद व मूकबधिर मुलांची शाळा येथे मिष्टान भोजन देण्यात येणार असुन दि २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पंढरपूर येथील एड्सग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या हिराप्रभा प्रतिष्ठान संचलित पालवी या संस्थेत फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे दि २५ सप्टेंबर रोजी सायं ४ वाजता संत चोखामेळा नगर व संत दामाजी नगर येथे वास्तव्याला असणाऱ्या व धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना साडी वाटप तर त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
दि २६ सप्टेंबर रोजी सायं ४ वाजता वृक्षदान एक घर एक झाड देण्यात येणार असुन दि २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आरोग्य तपासणी शिबिरातून बीपी, शुगर, इसीजी, हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे. दि २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर होणार असुन दि २९ सप्टेंबर रोजी सायं ४ वाजता गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध जेष्ठाना बेडशीट वाटप करण्यात येणार आहे तर दि ३० सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी निमित्त महाप्रसाद फराळाचे वाटप करण्यात येणार आहे तर २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता विजयादशमी निमित्त पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीची मिरवणूक काढली जाणार आहे.
देवीचा उत्सव साजरा करीत असताना समाजातील गरीब उपेक्षित राहणाऱ्या नागरीकांपर्यंत जाऊन त्यांना आधार देऊन खरा उत्सव साजरा करणे हा मंडळाचा मानस आहे या अगोदरही सामाजिक भान जपत मंडळाने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले असुन नगरपरिषद मंगळवेढा, पोलीस स्टेशन मंगळवेढा, सूर्योदय परिवार मेडसंगी, मे गजानन रत्नपारखी यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे आदर्श नवरात्र मंडळ म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत. नवरात्र उत्सव कसा असावा हे मात्र सप्तशृंगी नवरात्र मंडळाने सामाजिक उपक्रम घेऊन आपल्या कृतीतून दाखवून दिले असल्याने परिसरातील नागरिकांच्या वतीने कौतुक होत आहे.