टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याच्या कारणावरून या नव्या वादाला तोंड फुटले आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एकनाथ शिंदेमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. याआधीच्या अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. तर ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आता नगरविकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मिळत आहे.