टीम लोकमन पंढरपूर |
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी ता. पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात पालकसभेच्या समन्वयक सौ. अंजली चांदणे यांच्या प्रास्ताविक व स्वागताने झाली. मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. शिवशंकर कोंडूरु, सौ. चांदणे, प्रा. व्ही. पी. मोरे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सभेची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर (विभागप्रमुख) यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले, विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक व अतिरिक्त उपक्रम राबवले जातात, कार्यशाळा, सेमिनार, औद्योगिक भेटी व व्हॅल्यू अॅडेड प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कौशल्यवृद्धीवर विशेष भर दिला जातो, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी नियमित मेंटरिंग व समुपदेशन सत्रे घेतली जातात, विद्यार्थ्यांना तांत्रिक स्पर्धा, संशोधन प्रकल्प, हॅकाथॉन व नवनवीन उपक्रमांत सहभाग घेण्यास प्रोत्साहन दिले जाते, शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व दिले जाते, ज्यातून नेतृत्वगुण व टीमवर्क विकसित होतात, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंटसाठी विभागामार्फत सातत्याने मार्गदर्शन केले जाते.
डॉ. समीर कटेकर (प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी) यांनी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमांची माहिती दिली.तसेच पालकांनी विभाग व शिक्षक पालक यांच्याशी संपर्कात राहावे, असे आवाहन केले. यानंतर वर्गात व विद्यापीठात उत्तम यश संपादन केलेले विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला व नंतर पालक संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सिद्धेश्वर जाधव पाटील उपस्थित होते. त्यांनी देखील आपले मत मांडले .पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्ये व नोकरीच्या संधींबाबत महाविद्यालयास मौल्यवान सूचना दिल्या. प्राध्यापकांनी पालकांना विभागामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियान बागवान, ओंकार पडगळ आणि अनघा कुलकर्णी यांनी केली. सभेची सांगता श्री. डी. एम. कोरके यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.