news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सांगण्याजोगे ! वारी परिवारामुळे मंगळवेढा स्मशानभूमी ठरतेय परिवर्तनाची नांदी ; स्मशानभूमीत राहणाऱ्या उप्पेवाड कुटूंबाला वारी परिवाराने दिली गीर गाय भेट

टीम लोकमन by टीम लोकमन
July 14, 2025
in सांगण्याजोगे
0
सांगण्याजोगे ! वारी परिवारामुळे मंगळवेढा स्मशानभूमी ठरतेय परिवर्तनाची नांदी ; स्मशानभूमीत राहणाऱ्या उप्पेवाड कुटूंबाला वारी परिवाराने दिली गीर गाय भेट

टीम लोकमन मंगळवेढा |

संत विचारातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगळवेढा येथील वारी परिवारामुळे मंगळवेढ्याची स्मशानभूमी परिवर्तनाची नांदी ठरत आहे. सद्यस्थितीत मंगळवेढा स्मशानभूमीत (मातीवेळी) तिसऱ्या दिवशी घास शिवण्यासाठी कावळ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली असुन लोकांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागले. ही समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी घास शिवण्याचा प्रश्न संपविण्यासाठी स्मशानभूमीत राहणाऱ्या उप्पेवाड कुटूंबाला वारी परिवाराच्या वतीने एक गीर गाय देण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीत आईनंतर मातेचा दर्जा हा गाईला दिला जातो. त्यामुळे सदर गोमातेचा आशीर्वाद देखील मृत व्यक्तीच्या आत्म्यास व त्यांच्या परिवारास मिळणार आहे. तसेच घरातील गेलेल्या मृत व्यक्तीची रक्षा (राख) व अस्थी नदीतील पाण्यात, तिर्थक्षेत्री किंवा विहरीत विसर्जन न करता शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबरच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे. रक्षा (राख) नदीमध्ये विसर्जन करण्याऐवजी आपल्या शेतात किंवा योग्यस्थळी विसर्जित करून त्यावर आंबा, वड, पिपंळ, कडुलिंब किंवा कुठलेही फळझाड वृक्ष लावावेत.

हा निसर्ग अविरतपणे आपल्याला ऑक्सीजन पुरवण्याचे काम करतो आणि ऑक्सीजनमुळेच आपल्या मृत व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास मंगळवेढा स्मशानभूमी पर्यंत पोहचला आहे पुढील अनेक पिढ्याना शुद्ध प्राणवायू मिळावा या भावनेने मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करुन मृत व्यक्तीला आपण लावलेल्या झाडाच्या रूपात पाहिले तर ती व्यक्ती झाडाच्या रूपात जिवंत राहील यासाठी पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी रक्षा गोळा करून आणि वृक्ष लावून आपण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्यासारखी आहे.

मरावे परी वृक्षरूपी उरावे असा संदेश देणारा डिजिटल बोर्ड लावून मंगळवेढेकरानां आवाहन करण्यात आले आहे. याअगोदरही वारी परिवाराने स्मशानभूमी परिसरात झाडी लावून त्याचे संवर्धन करून हा परिसर हरित केला आहे. तसेच स्मशानात राहणाऱ्या महिलेचा महिला दिनानिमित्त सत्कार करून वेगळा आदर्श उभा केला आहे. खरोखरच वारी परिवाराने वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवून काळाची पाऊले ओळखून संत विचारांचे बिजारोपण करीत स्मशानभूमीचा कायापालट केला आहे.

यावेळी अजित शिंदे, ॲड. रमेश जोशी, विष्णू भोसले, विजय हजारे, रतिलाल दत्तू, राजेंद्र नलवडे, रितेश मोरे, रविराज जाधव, स्वप्निल टेकाळे, प्रफुल्ल सोमदळे, अविराज जाधव, अरुण गुंगे, परमेश्वर पाटील, दत्तात्रय भोसले, विठ्ठल बिले, पांडुरंग नागणे, विक्रम माने, अजय आदाटे, नानासाहेब चेळेकर, सिद्धेश्वर डोंगरे, प्रा. विनायक कलुबर्मे, सतिश दत्तू यांचेसह उप्पेवाड कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Previous Post

मंगळवेढा येथील नूतन मराठी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश, 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ; शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम

Next Post

केंद्रीय पथकाकडून जलजीवन मिशनच्या बीबीदारफळ मधील कामांची पाहणी, गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा : शिष्यपाल सेठी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group