news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 ची तयारी अंतिम टप्प्यात : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 1123 पैकी 35 ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी

टीम लोकमन by टीम लोकमन
July 5, 2025
in ताज्या घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात 12 मे पासून क्षेत्रीय तपासणी संच (एफटीके) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत सर्व तयारी पुर्ण झाली आहे.सर्व गावात स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत.जिल्ह्याने यापुर्वी देखील या अभियानात चांगली कामगिरी केली आहे.यासाठी १ हजार गुणांची तयारी करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत घटकनिहाय तयारी करणेत आली आहे.यासाठी सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची टीम कार्यरत आहे.येत्या १५ ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ११२३ पैकी ३५ ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी केली जाणार आहे.गाव कोणते निवडायचे ते केंद्र शासनाची समिती एक दिवस अगोदर यादी तयार करते.

केंद्राच्या पथकाकडून होणार तपासणी

जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायती सहभागी होत असतात. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती तयार ठेवणेत आलेली आहे.गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन या घटका अंतर्गत येणारे सर्व बाबीची तपासणी केली जाणार आहे.यातून गाव स्वच्छ व सुंदर ठरणार आहे.याची तयारी पुर्ण झाली आहे.

गुणांचे आधारे होणार मूल्यांकन

1. गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन सुविधासाठी च्या थेट निरीक्षणासाठी १२० गुण
2. ⁠ग्रामस्थांच्या थेट प्रतिसादासाठी १०० गुण
3. गावातील सुविधांच्या वापरा बाबत २४० गुण
4. ⁠प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे.

एकुण १ हजार गुणापैकी प्राप्त गुणानुसार देशात व राज्यातील जिल्ह्याचे नामाकन होऊन ग्रामपंचायतची निवड केली जाणार आहे.

या बाबींची होणार तपासणी

गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन व वैयक्तीक शौचालय, सार्वजिनक ठिकाणची स्वच्छता व सार्वजनिक शौचालय, वैयक्तीक स्वच्छता, न कुजणारे घटकांचे व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन व विलगीकरण या घटकांची तपासणी होणार आहे. गावातील कुटूंबांना भेट दिली जाणार आहे. वैयक्तीक स्वच्छता, कचरा विलगीकरणाची माहिती सर्वेक्षणातून प्रश्नावलीद्वारे विचारली जाणार आहे.ओला कचरा व सुका कचरा चे वर्गीकरणा बाबत माहिती घेतली जाणार आहे. हात धुणेचे सवयी, कुजणारे व न कुजणारे कचराचे वर्गीकरण केले आहे की नाही ? वैयक्तीक शौचालय स्वच्छ ठेवली जातात का ? या घटकांची तपासणी समिती कडून केली जाणार आहे.
अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)

Previous Post

शुक्रवारी सकाळी 6 वाजता श्री गजानन महाराज दिंडीचे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये आगमन होणार : सभापती सुशील आवताडे

Next Post

संताचा पालखी मार्गावर 11 हजार शौचालये भाविकांच्या सेवेत ; ग्रामविकास विभागाच्या निर्मल वारी उपक्रमामुळे वारकरी भाविकांमध्ये समाधान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group