टीम लोकमन मंगळवेढा |
नवी मुंबईतील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महाविद्यालयाचे प्रिन्सिपल त्याला अनेकदा जातीवादी शिवीगाळ करत होते आणि त्याच्या पुरुषत्वावर टीका करत होते. त्यामुळे तो दुखावला गेला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी महिला प्रिन्सिपलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रिन्सिपलवर विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित विद्यार्थी अनुसूचित जातीचा होता आणि पनवेल परिसरातील एका खाजगी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. 3 जून रोजी त्याने वसतिगृहाच्या खोलीत बेल्ट वापरून खिडकीच्या ग्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली. एफआयआरनुसार, गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाचे प्रिन्सिपल इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचा सातत्याने अपमान करत होते.








