news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात नवविवाहित गर्भवती महिलेची आत्महत्या ; संतापजनक कारण आले समोर, पतीसह सासू व सासरे गेले पोलीस कोठडीत

टीम लोकमन by टीम लोकमन
June 10, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात नवविवाहित गर्भवती महिलेची आत्महत्या ; संतापजनक कारण आले समोर, पतीसह सासू व सासरे गेले पोलीस कोठडीत

टीम लोकमन सांगली |

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच गर्भवती नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या नवविवाहितेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कुपवाड पोलिसांत नोंद झाला आहे.

ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत गर्भवती विवाहितेचे नाव असून तिचे वडील डॉ. चंद्रकांत पाटील (राहणार गुंडेवाडी, ता. मिरज) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कुपवाड पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत पतीसह तिघांना तत्काळ अटक केली आहे. पती सुकुमार सुरेश राजगे (वय 29), सासू अलका सुरेश राजगे (वय 49), सासरा सुरेश राजाराम राजगे (वय 53, सर्व अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मृत ऋतुजा हिचा विवाह सुकुमार राजगे याच्याशी 2021 मध्ये झाला होता. सुकुमार हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. लग्नात जावयाला साडेचार तोळ्यांची चेन, अंगठ्या असा मानपान केला होता. सुकुमार याच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना व रीतिरिवाजाप्रमाणे राहत असल्याचे ऋतुजा आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नापर्यंत माहित नव्हते. जून 2021 मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण सासू अलका हिने साजरा करू दिला नाही. त्यानंतर पती सुकुमार हा कामावर निघून गेला.

दरम्यान लग्नानंतरची पहिली दिवाळीही सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही. ‘आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाहीत. तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा. अशी संशयितांनी जबरदस्ती केली. तसेच ऋतुजा हिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करू दिला नाही. संशयितांनी तिला वारंवार त्रासही दिला. चर्चमध्ये प्रार्थना, पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला होता.

पती सुकुमार कडून ऋतुजाला मारहाण

दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली. त्यावेळी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करु असा दबावही तिच्यावर टाकण्यात आला. त्यानंतर पती सुकुमार याने ऋतुजाला मारहाणही केली. ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली होती. अखेर शुक्रवारी (दिनांक 6) तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर खळबळ उडाली. वडिलांच्या फिर्यादीनंतर पतीसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Previous Post

मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रविवारी बारावीच्या इंग्रजी विषयात नापास विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर : प्रा. तेजस्विनी कदम

Next Post

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनीच शरद पवार गटाला मोठे हादरे ; पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर, पवारांच्या राष्ट्रवादीला गळती

Next Post
मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का, ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार प्रवेश, राज्याच्या राजकारणात खळबळ

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनीच शरद पवार गटाला मोठे हादरे ; पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर, पवारांच्या राष्ट्रवादीला गळती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group