news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! पाकिस्तानसाठी हेरगिरी ; ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका युट्युबरला अटक, ज्योती मल्होत्रा व दनिशशी घनिष्ठ संबंध

टीम लोकमन by टीम लोकमन
June 4, 2025
in क्राईम
0
मोठी बातमी ! पाकिस्तानसाठी हेरगिरी ; ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका युट्युबरला अटक, ज्योती मल्होत्रा व दनिशशी घनिष्ठ संबंध

टीम लोकमन |

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर आणखी एका युट्यूबवर कारवाई करण्यात आली असून पंजाब पोलिसांनी युट्यूबर जसबीर सिंग याला अटक केली आहे. जसबीर सिंग हा रूपनगरमधील महालन गावचा रहिवासी आहे. त्याच्याशी संबंधित हेरगिरी नेटवर्कचा पोलिसांनी पदार्फाश केला असून ही कारवाई मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने केली आहे अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी X वर पोस्ट करत सांगितले आहे की, मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने रूपनगर येथील माहलन गावातील रहिवासी जसबीर सिंग याच्याशी संबंधित असलेल्या एक हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला. ‘जान महल’ नावाचे युट्यूब चॅनल चालवणारा जसबीर सिंग याचा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर उर्फ ​​जुट रंधावा याच्याशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. हरियाणातील सध्या अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​आणि एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश याच्याशीही त्याचा जवळचा संपर्क होता.

या प्रकरणी तपासात असेही आढळून आले आहे की, जसबीर दानिशच्या निमंत्रणावरून तीन वेळा (2020, 2021, 2024) दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमालाही तो उपस्थित राहिला होता. तिथे तो पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि व्लॉगर्सना देखील भेटला होता. तो 2020, 2021, 2024 मध्ये असे तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये अनेक पाकिस्तानमधील नंबर दिसून आले आहेत. त्याचीही आता तपशीलवार फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.

कोण आहे जसबीर सिंग?

जसबीर सिंग हा भारतीय नागरिक आहे. तो ‘जान महल’ नावाने युट्यूब चॅनल चालवत आहे. पाकिस्तानी हस्तकांसाठी काम करणाऱ्या अनेक मूळ भारतीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असल्याचा जसबीर सिंग याच्यावर आरोप आहे. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार सिंग याचे हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हकालपट्टी केलेला पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.

Previous Post

मोठी बातमी ! पंढरपूर पालखी मार्गावर भीषण अपघात ; आयशरने ऑटोला साठ फूट फरफटत नेले, पाच जण ठार, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश तर आयशर चालक फरार

Next Post

मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ? राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालत होणार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group