news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव घेत भामट्याने शिक्षिकेला घातला तब्बल 83 लाखाचा गंडा ; सोने व प्लॉट गहाण ठेवत कर्ज काढले आणि….

टीम लोकमन by टीम लोकमन
June 1, 2025
in क्राईम
0
मोठी बातमी ! पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला 9 कोटी रुपयांचा अपहार ; शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल

टीम लोकमन मंगळवेढा |

अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप कॉलवरून डिजिटल अरेस्ट केल्याचा प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत तब्बल 83 लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. चौकशीला सहकार्य करा असे सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी विश्‍वास नांगरे पाटील यांचे नाव घेत ही फसवणूक करण्यात आली आहे.

आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव सांगत केला फोन….

अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रीग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करा असे म्हणत व्हॉट्सॲप कॉल वरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला आहे. तुमच्या आधार कार्ड वरून दुसरे सिम कार्ड घेतले असून त्याचा दुरुपयोग झाल्याचे देखील बनावट कॉलद्वारे सांगण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू. यासाठी आम्हाला वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचेही निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.

सोने, प्लॉट गहाण ठेवत कर्ज काढले आणि….

संजय पिसे नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून आधी या निवृत्त शिक्षिकेला मुंबई पोलिसांचे बनावट ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर भीती दाखवून 21 ते 29 मे या दरम्यान सदर शिक्षिकेकडून तब्बल 83 लाख 1 हजार 816 रुपये उकळले. विशेष बाब म्हणजे निवृत्त शिक्षकेने भीतीपोटी सोने व प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज काढून ही रक्कम दिल्याचे सांगितले. 30 मे रोजी गुन्हेगारांनी व्हाट्सअप वरून ब्लॉक केल्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

फसवणूक झालेल्या शिक्षिकेने भीतीपोटी स्वतःचे सोने आणि प्लॉट गहाण ठेवून कर्ज घेतले आणि ती रक्कम भामट्यांना ट्रान्सफर केली. अखेर 30 मे रोजी व्हॉट्सॲपवरून अचानक संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंबाजोगाई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

Previous Post

कोल्हापुरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा ; 30 मे रोजी रुग्णालये व रुग्णसेवक तर 31 मे रोजी आदर्श शिक्षण संस्था सन्मान सोहळा : मंगेश चिवटे

Next Post

खुशखबर ! वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर ; मे व जून दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार? महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group