टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पाडल्या त्यावेळी निवडणूक प्रचारामध्ये महायुती आणि घटक पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार सत्तेत येऊन सहा महिने होत आले. तरी देखील यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यावरून विरोधकांकडून वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता. त्यांनी अंग काढून घेत थेट आपण असे आश्वासन दिलेच नव्हते. असा पवित्रा घेतला. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी या विधानावरून युटर्न देखील घेतला आहे.
काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार?
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी असे आश्वासन दिलेले नाही. असे उत्तर देत अजित दादांनी कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल दिली होती. मात्र यावरून टीका झाल्यानंतर लगेचच अजित पवारांनी युटर्न घेतला आहे.
यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, आम्हाला राज्य चालवायचे आहे. आतापर्यंत आम्ही अनेक निवडणुकांमध्ये अनेक आश्वासन दिले आहेत. ज्यामध्ये आम्ही एकदा विज बिल माफी दिली होती. मात्र त्यानंतर आम्ही तो निर्णय मागे घेतला. होता कारण तो राज्याला परवडणारा नव्हता. तसेच महायुतीने जर जाहीरनामा दिला. त्यापेक्षा जास्त बजेट न बसणारा जाहीरनामा हा महाविकास आघाडीचा होता. जो कधीही अस्तित्वात येऊ शकला नसता. अनेक राजकारणी लोकांना आपल्याकडे लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी अशा घोषणा देत असतात. त्यावर सर्वांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत कोणीही निर्णय घेऊ शकत नाही. कारण त्या त्या वेळची परिस्थिती पाहून हा निर्णय घ्यावा लागतो.








