news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढ्यात 1 मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. सुजित कदम

टीम लोकमन by टीम लोकमन
April 27, 2025
in सांस्कृतिक
0
दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढ्यात 1 मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. सुजित कदम

टीम लोकमन मंगळवेढा |

शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 1 मे ते रविवार दिनांक 4 मे 2025 या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजीत कदम यांनी दिली.

गुरुवार दिनांक 1 मे रोजी दुपारी 4.30 वा. दलितमित्र स्व.कदम गुरुजींच्या पुतळयाचे पूजन व सर्व शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण, अमृत महोत्सव लोगो अनावरण कार्यक्रम आमदार समाधान आवताडे यांच्याहस्ते व उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, उदयोगपती पवनभैय्या महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, राष्ट्रवादीचे नेते अजीत जगताप, प्रदिप खांडेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजीत कदम, डॉ. सुभाष कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी 6.30 वा. शिवशंभो महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त श्रीमती चंदाताई तिवाडी यांचे भारूड आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 2 मे रोजी मंगळवेढा मायनिंग प्रा.लि. मंगळवेढा या कार्यालयाचे उदघाटन व डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या विज्ञान दिवस भाषणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पुणेचे उदयोगपती प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार राम नेहरवे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी 7 वाजता स्व.कदम गुरुजी स्मारक ते स्व.ताड आप्पा मळा या मार्गावर कृषी -क्रीडा ज्योत दौड काढण्यात येईल. सायंकाळी 4.00 वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्‍वर आवताडे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी 6.30 वा. होणार्‍या कवी संमेलनाचे उदघाटन तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम स्विकारतील. सदरच्या कवीसंमेलनामध्ये आबेद शेख, गुंजन पाटील, इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते, तालीब सोलापुरी, शिवाजी बंडगर आदींचा सहभाग आहे.

शनिवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 9.30 वाजता शिक्षणतज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचे 21 व्या शतकातील शिक्षकांची दिशा या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी 6.30 वाजता आनंदाच्या वाटा या विषयावर डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान होईल. रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 9.00 वाजता मंगळवेढयातील समस्त भजनी मंडळांचा हनुमान भजनी मंडळ आंबेचिंचोली व स्पंदन अ‍ॅकेडमी बेगमपूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.00 स्व. दलितमित्र कदम गुरुजी यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद होईल. दुपारी 2.00 वाजता संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ व आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.

सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक अ‍ॅड. शिवाजी पाटील, यतिराज वाकळे, ए.डी.भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली दलितमित्र कदम गुरुजी शास्त्र महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. गायकवाड, दलितमित्र कदम गुरुजी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आय. जाधव, इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. एस. काशिद, वेळापूरचे प्राचार्य आर. बी. पवार, बेगमपूरचे प्राचार्य के. सी. भोसले, भोसेचे प्राचार्य जयराम आलदर, नरखेडचे मुख्याध्यापक अजित शिंदे, आंबेचिंचोलीचे मुख्याध्यापक एस. व्ही. बाबर, उपमुख्याध्यापक एस. एम. नागणे, वेळापूरचे उपमुख्याध्यापक पी. एम. शिवशरण, पर्यवेक्षक सुहास माने, डी. जे. चंदनशिवे, बी. एस. सावळे, व्ही. बी. फुगारे, एल. एच. ओमने, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी, संस्था परिवार परिश्रम घेत आहेत.

Previous Post

सेवापुर्ती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे उपशिक्षक अशोक मलगोंडे यांचा आज मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात सेवापूर्ती सत्कार सोहळा

Next Post

राज्यात पुन्हा सैराट ! बापानेच भर लग्नात मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या, सजलेला मंडप झाला काही क्षणातच सामसूम ; सैराटच्या पुनरावृत्तीने महाराष्ट्र हादरला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group