टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील एकूण 28 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले. दिल्लीतील सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे सन 2024-25 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. विविध परीक्षांमध्ये प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. ऑलिम्पियाड परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या विशेष ज्ञानाची चाचणी घेणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. पारंपारिक शालेय अभ्यासक्रमानुसार बाहेर जाऊन विद्यार्थ्यां मधील कौशल्यांची आणि तर्कशक्ती ची परीक्षा पाहण्या साठी ही परीक्षा घेतली जाते. तसेच या परीक्षेच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थ्यां मधील सुप्त ज्ञानाची ही चाचणी घेउन त्यास प्रोत्साहन दिले जाते. इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये 2 सुवर्णपदके, नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये 8 सुवर्णपदके, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये 14 सुवर्णपदके, नॅशनल जी के ऑलिम्पियाडमध्ये 4 सुवर्णपदके विद्यार्थ्यांना मिळाली.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, हिरकणी महिला पतसंस्थेच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









