news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! राज्य सरकार घेणार चारचाकी वाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध ; आत्तापर्यंत 4 हजार 398 घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केली तपासणी, महिला व बालकल्याण विभाग ॲक्शन मोडवर

टीम लोकमन by टीम लोकमन
March 24, 2025
in ताज्या घडामोडी
0
लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! राज्य सरकार घेणार चारचाकी वाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध ; आत्तापर्यंत 4 हजार 398 घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केली तपासणी, महिला व बालकल्याण विभाग ॲक्शन मोडवर

टीम लोकमन मंगळवेढा |

कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुरुवातीपासूनच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेक सदन महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन यासंदर्भात तपासणी करत आहेत.

लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 हजार 398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. त्यात 2 हजार 673 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचे या तपासणी दरम्यान निदर्शनास आले आहे. महिला बालकल्याण विभागाकडे 11 हजार अर्ज तपासणीसाठी आले आहेत. 10 हजार 794 लाडकी बहीण योजनेतील महिलांकडे चारचाकी असल्याचे निदर्शनास आल्याने ती यादी प्रत्यक्ष तपासणीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण विभागाने तालुका निहाय यादी तयार करून ती अंगणवाडी सेविकांकडे प्रत्यक्ष तपासणीसाठी सोपवण्यात आली आहे व अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थीच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. तपासणीत चारचाकी असल्याचे निदर्शनास आल्यास ती नावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्यात येत असताना ज्यांच्या त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे अथवा शासकीय नोकरी लागली असेल त्यांनी स्वतःहून योजनेतून नाव वगळण्यासाठी अर्ज करावा असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी केले आहे.

पाच एकरपेक्षा अधिक शेती लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे असू नये ही पण अट लाडकी बहीण योजनेत आहे. त्या संदर्भातही आता शासनाकडून तपासणी केली जाणार आहे.

Previous Post

कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघातर्फे सलून मॅनेजमेंट व फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्र संपन्न : अध्यक्ष श्रीकांत झेंडे

Next Post

हायप्रोफाईल चोर ! चोरी करण्यासाठी तो चक्क विमानाने सोलापूरला यायचा ; विमानाने जाऊन चोरी करणाऱ्या चोराच्या सोलापूर पोलिसांनी मुसक्या कशा आवळल्या?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group