news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघातर्फे सलून मॅनेजमेंट व फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्र संपन्न : अध्यक्ष श्रीकांत झेंडे

टीम लोकमन by टीम लोकमन
March 23, 2025
in सामाजिक
0
कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघातर्फे सलून मॅनेजमेंट व फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्र संपन्न : अध्यक्ष श्रीकांत झेंडे

टीम लोकमन कोल्हापूर |

आज कोल्हापूर मध्ये हॉटेल एटरिया येथे कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकान मालक जनसेवा संघातर्फे सलून मॅनेजमेंट व फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोल्हापुरातील सुमारे दीडशे पेक्षा अधिक सलून व्यावसायिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष श्रीकांत झेंडे यांनी प्रस्तावना व संघटनेच्या कामाचा आढावा सांगितला. यानंतर प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष बाबासाहेब काशीद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुती टिपूगडे, गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे, यांनी मार्गदर्शन केले.

दुकान मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर बापू झेंडे, नाभिक बोर्डिंगचे अध्यक्ष नारायण पवार, कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे धडाडीचे नेतृत्व व युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन चव्हाण, बोर्डिंगचे ट्रस्टी भरत माने, पंचगंगा बँकेचे संचालक भगवान काशीद, विभागीय उपाध्यक्ष दत्ताजी टिपूगडे, बोर्डिंग व युवक संघटनेचे उपाध्यक्ष दीपक खराडे यांचेसह उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार संयोजकांचे वतीने करण्यात आले.

बलुतेदारीत अडकलेल्या नाभिक व्यवसायाला सलून इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्त करून देणारे आणि नाभिक व्यवसायाला ग्लॅमरस देणारे, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या अत्याधुनिक सलोनची निर्मिती करणारे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले हेअर व मेकअप आर्टिस्ट म्हणून नामांकित असलेले, आपल्या ‘ओके’ या कलादालनातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मामा (माहिर व मातब्बर) कलाकार घडविणारे, कोल्हापूर नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत झेंडे यांनी सलून मॅनेजमेंट या विषयावर अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत व्यवसाय वाढीसाठी काय करणे आवश्यक आहे. यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. एन जे इंडिया इन्व्हेस्टमेंट चे अजिंक्य सर व राहुल कुलकर्णी सर यांनी फायनान्स मॅनेजमेंट या विषयावर बचत किती महत्त्वाचे आहे आणि आपल्याला रिटायर लाईफ कसं निवांत जाऊ शकतं याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

समाजाला या सेमिनार मधील दोन्ही विषयांचे ज्ञान मिळण्याची नितांत आवश्यकता होती. दोन्ही विषय सरळ सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाल्यामुळे सर्व सलून व्यावसायिक समाधानी झाल्याचे पाहायला मिळाले. या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी राहुल टिपूगडे यांनी केले तर शहराध्यक्ष विकी सूर्यवंशी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी उदय गवळी, संग्राम काशीद, विजय मांढरेकर, गणेश मोरे, संग्राम माटे, सुनील खेडकर, अमोल टीपुगडे, तानाजी मर्दाने, सचिन मेथे, केरबा टीपुगडे, अमोल चौगले, सचिन यादव यांनी बहुमोल असे सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत झेंडे अध्यक्ष, सतिश चव्हाण उपाध्यक्ष, राहुल टीपुगडे सेक्रेटरी, दीपक माने सहसेक्रेटरी, प्रमोद झेंडे खजिनदार, संचालक अविनाश यादव, मोहन साळुंखे, सोमण गवळी, चंद्रकांत राऊत, राहुल काशीद, दिलीप टीपुगडे, इंद्रजित जगताप यांनी प्रयत्न केले.

Previous Post

मोठी बातमी ! बीड पोलीस ॲक्शन मोडवर, मुंडेंवर लावला 1981 चा कायदा, गावगुंडांना भरली धडकी ; पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ

Next Post

लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! राज्य सरकार घेणार चारचाकी वाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध ; आत्तापर्यंत 4 हजार 398 घरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केली तपासणी, महिला व बालकल्याण विभाग ॲक्शन मोडवर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group