news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रौप्य महोत्सव वर्ष 2025 ! मरवडे फेस्टिव्हलला आजपासून प्रारंभ, कलावंतांच्या शोभायात्रेने होणार सुरुवात ; 17 ते 22 मार्चपर्यंत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी 

टीम लोकमन by टीम लोकमन
March 17, 2025
in सांस्कृतिक
0
रौप्यमहोत्सवी वर्ष 2025 ! कलावंतांची शोभायात्रा ठरणार मरवडे फेस्टिव्हलचे आकर्षण ; 17 मार्च रोजी राज्यातील शेकडो पारंपारिक कलावंत होणार शोभायात्रेत सहभागी : सुरेश पवार

 

टीम लोकमन मरवडे |

कलावंतांचे माहेरघर म्हणून नावलौकिक असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचा रौप्यमहोत्सवी सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत असून या सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.

तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर होणाऱ्या गाव यात्रेला जोडूनच सन 2000 पासून मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटकाळातील एका वर्षाचा खंड वगळता हा कार्यक्रम निरंतर राबविला जात आहे. कलावंत व लोककलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मरवडे फेस्टिव्हलकडे पाहिले जाते. म्हणूनच रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये शेकडो कलावंत व पारंपरिक वाद्य कलाकार सहभागी होणार आहेत.

मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती परिवाराच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन मरवडे नगरीचा लौकिक सर्वदूर पोहचविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच विरेंद्र केंजळे प्रस्तुत ‘साज सातारा ‘ हा सुंदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक 19 रोजी रात्री 8 वाजता शिवशाहीर रंगराव पाटील व कला पथक (कोल्हापूर) प्रस्तुत ‘मुद्रा भद्राय राजते’ हे ऐतिहासिक पोवाडा नाट्य आयोजित करण्यात आले असून शिवचरित्रातील 16 प्रसंगांचे सादरीकरण केले जाईल.

गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 वाजता मरवडे फेस्टिव्हलचे खास आकर्षण असलेल्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यामध्ये काष्ठशिल्पकार राहुल लोंढे, अमित भोरकडे, राजू रायबान यांच्या सुंदर पेंटिंग्ज, फोटोग्राफीचा आनंद रसिकांना मिळणार आहे. शिवाय युगंधर आखाड्याच्या वतीने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, तसेच माहेश्वरी कलादालन, यशवंत गाजूल, राकेश गायकवाड यांच्या दुर्मिळ वस्तूंचे देखील प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुंदर रांगोळी, मूर्तीकाम, मातीकाम, कागदकाम या देखील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन शैक्षणिक सहलीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रंगभरण, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तर संध्याकाळी 8 वाजता जयदीप डाकरे (भूदरगड) प्रस्तुत ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हा मराठी लोक परंपरेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार दिनांक 21मार्च रोजी दुपारी 3 वाजता जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये शाळा व शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रित नृत्य कलावंतांचा ‘नृत्य जल्लोष’ साजरा होईल. या संपूर्ण सोहळ्याची सांगता शनिवार दिनांक 22 मार्च रोजी होणार असून सायंकाळी 4 वाजता मंगळवेढा तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील 25 मान्यवरांचा “समाज गौरव पुरस्काराने” विशेष सन्मान केला जाईल.

तर सायंकाळी 7.30 वाजता मरवडे फेस्टिव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य, कला क्षेत्रातील राज्य स्तरीय पुरस्कारांचे वितरण तसेच मरवडे भूषण, श्रावणबाळ तसेच आदर्श माता या पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच निमंत्रित कवींच्या उपस्थितीत ‘काव्यसंध्या’ हा कार्यक्रम होणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी तडेगांवकर (जालना) या भूषविणार आहेत. यावेळी नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), केशवराव खटींग (परभणी), अरुण पवार (परळी), कु. गुंजन पाटील (जळगांव), श्रीनिवास मस्के (नांदेड), रोहित शिंगे (इचलकरंजी), रमजान मुल्ला (सांगली), शरीफ सय्यद (सोलापूर), इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते (मंगळवेढा) इत्यादी मान्यवर कवींची उपस्थिती लाभणार आहे.

या संपूर्ण सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7057475610, 9421067107 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

मोठी लढाई रं लढू… मनगटाचा जोर लावून…! ‘तो’ आकाशात झेपावला आणि मरवडेकरांच्या माना अभिमानानं उंचावल्या ; मरवडे भूषण पुरस्काराच्या मानकऱ्यांनी एकत्र येऊन मरवडे फेस्टिव्हलचा बलून सोडला अवकाशात

Next Post

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व विविध मागण्यासंदर्भात श्री संत दामाजी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन ; शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा

Next Post
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व विविध मागण्यासंदर्भात श्री संत दामाजी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन ; शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व विविध मागण्यासंदर्भात श्री संत दामाजी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन ; शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group