news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेकडून इंग्लिश स्कूल येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी संपन्न ; शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी

टीम लोकमन by टीम लोकमन
March 15, 2025
in सामाजिक
0
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेकडून इंग्लिश स्कूल येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी संपन्न ; शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी

टीम लोकमन मंगळवेढा |

शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा या संस्थेच्या वतीने संस्थेच्या सर्व शाखेतील मुस्लिम बंधू भगिनींसाठी इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक, संचालिका तथा उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले, संचालक यतिराज वाकळे, इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेचे प्रभारी प्राचार्य सुनिल नागणे, पर्यवेक्षक सुहास माने, पर्यवेक्षिका लता ओमणे, युवा उद्योजक पवन महाडिक, इंग्लिश स्कूल भोसे प्रशालेचे प्राचार्य जयराम आलदर तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, संस्थेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेले मुस्लिम शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रमजान हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना आहे.या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे व उपवास केले जातात. रोजाबरोबर नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना याद्वारे अल्लाची इबादत केली जाते. रोजा या शब्दाला अरबी भाषेत सोम असे म्हणतात याचा अर्थ थांबणे असा होतो.या पवित्र महिन्यात महिनाभर रोजे करणारे रोजेदार दिवसभर अन्न पाणी घेत नाहीत. यामुळे आपले इंद्रियांना व मनाला संयमाची आवश्यकता असते यामुळे मन एकाग्र करायला मदत होते. याच महिन्यात पवित्र कुराणाचे अवतरण झाले. या काळात जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या आणखीन समीप जाणे होय.

रमजान म्हणजे बरकतीचा महिना. परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना याचेच औचित्य साधून ॲड. सुजित कदम व तेजस्विनी कदम यांच्या संकल्पनेतून शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम राबविला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक यातून दिसून आले. सर्वप्रथम रोजा इफ्तार करण्यात आला. त्यानंतर प्रशालेमध्ये मगरीबा नमाजचे पठण करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम शिक्षक बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचा नमाजी टोपी व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवालीचा अप्रतिम असा कार्यक्रम सादर केला. शेवटी सर्वांनी मिळून स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक आशपाक काझी, प्रा. अमजद खतीब, प्रा.जमीर मुलाणी तसेच युसुफ खाटीक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी मुस्लिम शिक्षक बांधवांकडून संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व शाखातील मुस्लिम शिक्षक बंधू भगिनी व समाजातील प्रतिष्ठित लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वतःच माहिती देत जयंत पाटील म्हणाले…

Next Post

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शरद पवार विद्यालयातील शिक्षक भारत रायबान यांना प्रदान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group