news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रौप्यमहोत्सवी वर्ष 2025 ! कलावंतांची शोभायात्रा ठरणार मरवडे फेस्टिव्हलचे आकर्षण ; 17 मार्च रोजी राज्यातील शेकडो पारंपारिक कलावंत होणार शोभायात्रेत सहभागी : सुरेश पवार

टीम लोकमन by टीम लोकमन
March 13, 2025
in सांस्कृतिक
0
रौप्यमहोत्सवी वर्ष 2025 ! कलावंतांची शोभायात्रा ठरणार मरवडे फेस्टिव्हलचे आकर्षण ; 17 मार्च रोजी राज्यातील शेकडो पारंपारिक कलावंत होणार शोभायात्रेत सहभागी : सुरेश पवार

 

टीम लोकमन मरवडे |

कलावंतांचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दि. 17 मार्च 2025 पासून सुरु होणाऱ्या यंदाच्या पंचविसाव्या मरवडे फेस्टिव्हलचा आरंभ कलावंतांच्या आविष्काराने नटलेल्या शोभायात्रेने होणार असून यामध्ये शेकडो कलावंत सहभागी होणार असल्याची माहिती छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा मरवडे फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश पवार गुरुजी यांनी दिली.

तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर संपन्न होणारी मरवडे गावची यात्रा कुस्तीच्या आखाड्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या गावयात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराच्या वतीने सन 2000 पासून मरवडे फेस्टिव्हल सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटकाळ वगळता दरवर्षी सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील चोवीस वर्षांत छत्रपती परिवाराने मरवडे फेस्टिव्हलमध्ये नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम राबविले आहेत. शालेय विद्यार्थी व नवयुवकांच्या कला गुणांना अविष्काराची संधी देतानाच महाराष्ट्राची गौरवशाली लोकपरंपरा जतन करुन ठेवणार्या कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा व दिमाखदार सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांची रेलचेल असलेला सोहळा म्हणून मरवडे फेस्टिव्हलकडे पाहिले जाते. यामध्ये प्रामुख्याने कवी संमेलने, नाटके, एकांकिका, एकपात्री प्रयोग, रेकॉर्ड डान्स, संगीत मैफिल, लोककला महोत्सव, जादूचे प्रयोग, हिपनाटीझम, कथा महोत्सव, हास्य दरबार, सप्त खंजिरी वादनाद्वारे प्रबोधनाचे कार्यक्रम, शाहिरी, गोंधळ गीत, लोकगीतांचे पारंपारिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करुन संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारच्या कलावंतांना कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. शिवाय दरवर्षी साहित्यिक व कलावंतांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंतांसाठी कला पंढरीचे असाधारण महत्त्व मरवडे नगरीला प्राप्त झाले आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मरवडे फेस्टिव्हलचा आरंभ कलावंत व लोककलावंतांच्या गौरवार्थ भव्य शोभायात्रेने दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पारंपारिक कलाप्रकार, पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये बँड पथक, सूरसनयी ताफा, हलगीपथक, नाशिक ढोल या वाद्यांसह लेझिम संघ, गजीढोल, झांज पथक, नाशिक ढोलचा गजर ऐकावयास मिळणार आहे.

याशिवाय लोककला जतन करुन ठेवण्यामध्ये अनमोल योगदान देणारे शाहीरी पथक, वासुदेव, वारकरी दिंडी, पिंगळा, पोतराज, मरिआईचा गाडा, बहुरुपी, गोंधळी, धनगरी ओव्या, सोंगी भारुड, भेदीक गाणी, बंजारा तसेच राजस्थानी नृत्य प्रकार यांचा समावेश आहे. याशिवाय ऐतिहासिक शिवकालीन पेहरावातील वेशभूषा तसेच पारंपरिक वेशभूषेतील शेकडो अबालवृद्ध सहभागी होणार आहेत. यावेळी अनेक ठिकाणी Selfy तसेच Standy Point उभारण्यात येणार असल्याने पारंपरिक शोभायात्रेतील संस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी हजारो रसिकांना मिळणार आहे.

या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या कलाकार व कलापथकांना सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात येणार असून आर्थिक खर्चाची तरतूद करण्यात आली असून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7057475610, 9421067107, 9764525281 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय ; आमदार समाधान आवताडे यांनी अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना दिला इशारा

Next Post

मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वतःच माहिती देत जयंत पाटील म्हणाले…

Next Post
मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वतःच माहिती देत जयंत पाटील म्हणाले…

मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वतःच माहिती देत जयंत पाटील म्हणाले...

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group