टीम लोकमन पंढरपूर |
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सानपाडा ट्रॅक्शन सिस्टिम नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी एन्कॉन पुणे औद्योगिक भेट विद्युत उर्जेचा वापर विषयाच्या प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या औद्योगिक भेटीमध्ये 50 विद्यार्थी आणि 4 प्राध्यापकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही भेट विद्यार्थ्यांना सानपाडा ट्रॅकशन सिस्टिम कंपनीत तयार होत असलेले विद्युत उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठरली. एन्कॉन या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना कंट्रोल पॅनल, मॅन्युफॅक्चरिंग याबद्दल माहिती भेटली व अद्यावत तंत्रज्ञान प्रोग्रामेबल लॉजीक कंट्रोलर(PLC) व परिवर्तनीय वारंवारता ड्राईव्ह(VFD) याबद्दलही विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली.
ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे व विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. तसेच ही भेट यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. दत्तात्रय कोरके, सौ. तृप्ती कदम व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.







