टीम लोकमन मंगळवेढा |
श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या महाविद्यालयाची 2024 – 25 या शैक्षणिक वर्षाची अभ्यास सहल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण, सिंधुदुर्ग, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे, मार्लेश्वर, कोल्हापूर या धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या शैक्षणिक अभ्यास सहलीमध्ये महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. जावेद तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘गड किल्ले जतन व संवर्धन’ या मोहिमेअंतर्गत किल्ल्याच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली व आसपासच्या परिसराची स्वच्छता केली.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. परमेश्वर होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अंतर्गत महिला बचत गटाच्या विविध उत्पादित साधनांच्या प्रदर्शन व विक्री केंद्राला विद्यार्थ्यांनी भेट देऊन उत्पादित वस्तूची माहिती घेतली. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी साहित्यातील सिंधुदुर्गचे चित्रण याची माहिती दिली.
महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सागरी कासव संरक्षण व उबवण केंद्र यांना भेट देऊन पाहणी केली. भूगोल विभागाचे प्रा. डॉ. राजाराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागाचे विद्यार्थीही या अभ्यास सहलीमध्ये सहभागी झाले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. परमेश्वर होनराव, प्रा. डॉ. राजकुमार पवार, प्रा. डॉ. राजाराम पवार, प्रा. सरिता भोसले, प्रा. डॉ. मायाप्पा खांडेकर, प्रा. धैर्यशील भंडारे, प्रा. दिपाली खांडेकर व वरिष्ठ विभागाचे सहल प्रमुख प्रा. डॉ. जावेद तांबोळी यांनी परिश्रम घेतले.