टीम लोकमन मंगळवेढा |
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शन व आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जा, परीक्षेची भीती न बाळगता शिक्षकांनी घेतलेले परिश्रम, घेतलेला सराव याचे रूपांतर यशामध्ये करा असे मत जनसेवा शिक्षण व समाजसेवा मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते नूतन मराठी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व शुभेच्छा प्रदान कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक गोरक्ष जाधव उपस्थित होते.
यावेळी गोरक्ष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशालेतील शिक्षकांनी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन केले आहे. यशस्वी सगळेच होतात पण विद्यार्थ्यांनी गुणवंत व्हावे असे आवाहन केले. शिक्षकांची गरज का असते, ध्येय प्राप्तीसाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो त्यासाठी शिक्षकाचे मार्गदर्शन महत्वाचे असते. परीक्षा कालावधीत तणावावर नियंत्रण कसे मिळवायचे, मैत्रीचा अभिमान बाळगा, गुरूची गुरुदक्षिणा महत्वाची असून त्याची आठवण विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जाधव सर यांनी त्यांचे कथासंग्रह व कवितासंग्रह प्रशालेच्या ग्रंथालयास भेट दिले. कार्यक्रमात स्नेहा टाकणे, स्वप्नाली माने, जोया मुजावर, मानसी गायकवाड यांनी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्या मनोगतामधून आभार व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक गुरनिंग बंडगर, सहशिक्षक योगेश कुलकर्णी, विठ्ठल जमखंडी, श्रीराम पाटील, विजय मेटकरी, सहशिक्षिका अवंती पटवर्धन, राधिका कुसाळकर, तनुजा टाकणे, विद्या हुगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी नूतन मराठी महाविद्यालयाच्या इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रशालेस भेटवस्तू दिली. प्रशालेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य परीक्षेसाठी देण्यात आले. शुभेच्छा प्रदान कार्यक्रमासाठी इयत्ता नववीतील ऋतुजा इंगळे, वैष्णवी वाकडे, सानिका सावंजी, कार्तिकी भोजने, अक्षता खोकले, वसुधा स्वामी, प्रियांका मोरे, समृध्दी चंदनशिवे, प्राजक्ता दत्तू, श्रेयसी भगरे, भाग्यश्री ओमणे, कल्याणी सावंत, प्रज्ञा माळी, सृष्टी बुरकुल, समृध्दी जाधव, हुमेरा काझी यांनी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील मनस्वी माने, संस्कृती फटे यांनी केले तर आभार प्रदर्शन ईश्वरी कोंडुभैरी हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कसगावडे, प्रदीप लाड, सुयश इंगळे, सत्यजित ढाणे, जयदीप मेटकरी यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.










