news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सोलापुरात भीषण अपघात ! बल्कर गॅरेजमध्ये घुसून झालेल्या अपघातात दोन दुचाकींचा चक्काचूर ; जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासह तीन ठार तर चौघे गंभीर जखमी

टीम लोकमन by टीम लोकमन
February 16, 2025
in क्राईम
0
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्रालगत गॅरेजमध्ये थेट बल्कर घुसल्याने तिघे ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या दोन दुचाकींचा चक्काचूर होऊन दोघे जागीच ठार झाले तर एकाचा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

आसिफ चाँदपाशा बागवान (वय ४५), तोहीद माजीद कुरेशी (वय २०, रा. सरवदेनगर, सोलापूर), विवेकानंद राजकुमार लिंगराज (वय ५५, रा. सतनाम चौक, लष्कर सोलापूर) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये वाजीद अलीम कुरेशी (वय ४९), माजीद महीबूब चौधरी (वय ३६, रा. दोघे सरवदेनगर, सोलापूर), करीम बादशहा बेपारी (वय २८, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांच्यासह अन्य एक अशा चौघांचा समावेश आहे.

हैदराबाद रोडवर सायंकाळी नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ असतानाच अचानक हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या MH 44 U 7495 या बल्करचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. याचदरम्यान बल्करने सोलापूरकडून हैदराबाद रोडकडे आपल्या स्कूटरने जाणाऱ्या विवेकानंद लिंगराज यांना सर्वप्रथम उडवले. याचदरम्यान, हैदराबाद रोडने दुचाकीवरून येणाऱ्यालाही उडवले. यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

तर तोहीद कुरेशी हा त्याच्या तोहीद बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या वाहनांचे काम करीत असताना बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीला पांगवून तातडीने क्रेनच्या मदतीने गॅरेजमध्ये घुसलेला बल्कर काढला.

सुसाट बल्करच्या या अपघातात दुचाकीसह अन्य वाहने चक्काचूर झाली. काय घडतेय हे कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने एकच हलकल्लोळ उडाला. आरडाओरड सुरू झाली. गॅरेजच्या बाजूला असलेल्या पंक्चरच्या दुकानात काम करणारा कामगारही या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज मंगळवेढा येथे पंकजपाल महाराज यांच्या सप्त खांजिरी कीर्तनातून प्रबोधनवाणी ; सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पाचवे पुष्प

Next Post

स्तुत्य उपक्रम ! मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात 356 जणांचे रक्तदान ; ऐन उन्हाळ्यात रक्तसंकलनाची मंडळाची परंपरा कायम

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group