news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार ; एक कोटींच्या खंडणीचा आरोप, काय आहे नेमके प्रकरण?

टीम लोकमन by टीम लोकमन
February 12, 2025
in क्राईम
0
मोठी बातमी ! डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने वार करत तलाठ्याची हत्या ; व्हाटसॲप चॅटवरून झाला राडा, घटनेने महसूल प्रशासनात खळबळ, महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन सोलापूर |

संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक प्रदीप शिंगवी यांचेसह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर या प्रकरणतील पीडित महिलेविरोधात सुद्धा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील एका संस्थेत अधिक्षक पदावर नोकरी लावतो असे म्हणत आरोपी प्रदीप शिंघवी याने अत्याचार केला. तर संस्थेतल्या दोन महिलांनी पीडितेस धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. मूळची मुंबईची असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 69 आणि ऍट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने एक कोटीची खंडणी मागितल्याचा उद्योजकाचा आरोप

पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आलेले होते. मात्र ती महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती. कामावर पुन्हा घ्या अन्यथा तुमच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन. अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा आरोप शिंगवी यांनी केला आहे. प्रदीप शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासानंतरच पुढील कारवाई पोलिसांची माहिती

या प्रकरणात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली आहे.

Previous Post

स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना साकार : प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढ्यात शिवमुर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात

Next Post

व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणांना संत विचारांची गरज : भारूडकार संदीप मोहिते, जुगलबंदी भारूडातून समाज प्रबोधन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group