news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना साकार : प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढ्यात शिवमुर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात

टीम लोकमन by टीम लोकमन
February 11, 2025
in सांस्कृतिक
0
मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने 11 ते 19 फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ; रक्तदान शिबीरासह वेशभूषा व चित्रकला स्पर्धा

टीम लोकमन मंगळवेढा |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना लिहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठी प्रेरणा मिळाली असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.

ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवमुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे उपस्थित होते. सुरवातीस शिवमुर्तीचे पूजन करून जिजाऊ वंदना व ध्येयमंत्राने जयघोष करण्यात आला.

यावेळी प्रा. काळुंगे म्हणाले, मंडळाकडून नेहमीच शिवजयंती उत्सव साजरा करण्याची आदर्श परंपरा जोपासली जात आहे. चारशे वर्षानंतरही शिवचरित्र प्रत्येकाला जगण्याची दिशा दाखवीत आहे. ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. असे सांगून अनेक ऐतिहासिक दाखले देत छत्रपतीचे विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना सोमनाथ आवताडे म्हणाले, सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज निर्माण करणारा या जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवजयंती मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगले विचार पेरण्याचे कार्य सुरु असून समाजाचे प्रबोधन होत आहे ही खरी शिवजयंती आहे असे सांगुन सर्वाना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात शिवजयंती साजरी होत असताना खूपच आनंद होत आहे असे सांगून मंडळाचे कौतुक केले. यावेळी रामचंद्र वाकडे, सचिन वाघमारे, दिनेश सोनुने, धनंजय इंगोले यांचेसह सर्व जेष्ठ सल्लगार, माजी अध्यक्ष, पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हर्षद डोरले यांनी केले. सूत्रसंचालन भारत मुंढे यांनी तर अध्यक्ष बाळासाहेब नागणे यांनी आभार मानले.

Previous Post

धक्कादायक ! राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण ; पुणे विमानतळावरून बेपत्ता, पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल, तानाजी सावंत म्हणाले कमीत कमी 15 ते 20 फोन….

Next Post

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार ; एक कोटींच्या खंडणीचा आरोप, काय आहे नेमके प्रकरण?

Next Post
मोठी बातमी ! डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने वार करत तलाठ्याची हत्या ; व्हाटसॲप चॅटवरून झाला राडा, घटनेने महसूल प्रशासनात खळबळ, महाराष्ट्र हादरला

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार ; एक कोटींच्या खंडणीचा आरोप, काय आहे नेमके प्रकरण?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group