टीम लोकमन पंढरपूर |
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरच्या विदयुत अभियांत्रिकी विभागात “C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग” सॉफ्टवेअरवरील विशेष मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यकर्माचे उदघाटन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. कोंडूरू शिवशंकर, प्राध्यापक वर्ग आणि आयटी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षक ए. डी. अनुसे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
विभाग प्रमुख डॉ. कोंडूरू शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत C++ भाषाचे सॉफ्टवेअर विकास क्षेत्रातील महत्त्व पटवून दिले. तसेच ए.डी.अनुसे तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षक यांनी सांगीतले की, C++ ही भाषा सॉप्टवेअर डेव्हलपमेंट साठी वापरली जाते. यामध्ये गेम डेव्हलपमेंट, डेटा स्ट्रक्चर्रस आणि अल्गोरिदम, एम्बेडेड सिस्टीमस, वेब डेव्हलपमेंट, साईंटीफिक कम्प्युटिंग, मोबाईल ॲप्लीकेशन अशा विविध प्रकारचे ॲप्लीकेशन या सॉप्टवेअरमध्ये वापरले जाते.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी.एम. कोरके यांनी C++ भाषाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, या भाषामुळे वेबसाइट डिझाइन, सिम्युलेशन आणि इतर प्रगत डिझाइन प्रक्रिया विद्याथ्यांना शिकता येतील, ज्यामुळे त्यांचे आयटी क्षेत्रातील कौशल्य व कार्यक्षमता वाढेल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत असे कार्यक्रम केवळ तांत्रिक ज्ञान विकसित करण्यापुरते मर्यादित नसून ते विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक यशासाठी मार्गदर्शक ठरतात असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कोर्समध्ये C++ या प्रोग्रामिंग भाषा सॉफ्टवेअरच्या विविध उपयोजनांवर विशेष भर दिला. यात C++ भाषेचा परिचय, डेटा संरचना, विविध परिस्थिती, OOP संकल्पना, उद्योगाभिमुख C++ प्रोग्रामिंग आणि इतर प्रगत संकल्पनांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन आणि वेब विकास डिझाइनच्या व्यावसायिक गरजांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा संपूर्ण लाभ घेतला असून, आपले आयटी क्षेत्रातील कौशल्य प्रगल्भ करण्याचा निर्धार केला आहे. हा कार्यक्रमामध्ये द्वितीय वर्षातील शिकत असणाऱ्या 75 हून अधिक विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाने असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. ज्यामुळे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहतील आणि जागतिक औद्योगिक आणि आयटी तंत्रज्ञान गरजांशी जोडले जातील. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही. पी. मोरे, डी. एम. कोरके, एन. व्ही. खांडेकर, ए. एन. गोडसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








