news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

कशी काळाची चाहूल आली ! ती घरातून निघाली, थोड्यावेळाने मित्राचा फोन आला ‘वहिनी गेली रे’… सांगलीत महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू ; कर्तव्यावर जात असताना काळाचा घाला

टीम लोकमन by टीम लोकमन
February 7, 2025
in क्राईम
0
कशी काळाची चाहूल आली ! ती घरातून निघाली, थोड्यावेळाने मित्राचा फोन आला ‘वहिनी गेली रे’… सांगलीत महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू ; कर्तव्यावर जात असताना काळाचा घाला

टीम लोकमन सांगली |

राज्यात अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता बलवडी (ता. खानापूर) येथील सांगली- सातारा जुन्या रस्त्यावरील बलवडी फाट्यानजीक चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील प्रितंका अनंत पोटे (वय 32, देवराष्ट्रे, ता. कडेगाव) या महिला पोलिस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास बलवडी फाट्यावर हा अपघात झाला आहे. याबाबत पोलीस महिलेचा दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रितंका पोटे या तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे येथून त्या तुरची येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे दुचाकीवरुन (MH 10 DH 9906) निघाल्या होत्या. बलवडी फाटा येथे आल्यानंतर चारचाकीची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रितंका यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून प्रितंका यांचा बलवडी फाट्यावर अपघात झाल्याचे कळविले. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बलवडी फाट्याकडे धाव घेतली.

दरम्यान प्रितंकांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर पोटे यांच्या दुचाकीसह चारचाकी गाडीचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. विटा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. प्रितंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. चारचाकी चालक उदय रामचंद्र पवार (वय 36, राहणार रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ! खटला जिंकताच करुणा शर्मा ॲक्शन मोडवर ; आमदारकीचा राजीनामा द्या म्हणत करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या संपत्तीवर देखील दावा करणार, काय आहे प्रकरण?

Next Post

मोठी बातमी ! जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांचेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल ; मुख्यमंत्री फडणवीसांच्या लाडक्या नेत्याची आमदारकी धोक्यात?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group