news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ! खटला जिंकताच करुणा शर्मा ॲक्शन मोडवर ; आमदारकीचा राजीनामा द्या म्हणत करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या संपत्तीवर देखील दावा करणार, काय आहे प्रकरण?

टीम लोकमन by टीम लोकमन
February 6, 2025
in ताज्या घडामोडी
0
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ ! खटला जिंकताच करुणा शर्मा ॲक्शन मोडवर ; आमदारकीचा राजीनामा द्या म्हणत करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या संपत्तीवर देखील दावा करणार, काय आहे प्रकरण?

टीम लोकमन मंगळवेढा |

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

हा खटला जिंकल्यानंतर आता करुण शर्मा या ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. करुणा शर्मा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले. यावेळी करुणा शर्मा यांनी मी धनंजय मुंडेंच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार असल्याचे म्हटले आहे.

मला पोटगी मिळाली हा माझा विजय : करुणा शर्मा

“मला पोटगी मिळाली हा माझा विजय आहे. माझी आई नव्हती. मला तुरुंगात टाकल्यापासून माझ्या बहीण आणि भावाने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी एकटीच लढत आहे. तीन वर्षापासून एकटीच लढत आहे. आई असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. जेव्हा हे विचार येतात तेव्हा माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ती आत्महत्या करून मेली. तिने आमचा विचार केला नाही”, असे करुणा शर्मा म्हणाल्या.

वाल्मिक कराडने मला मारले होते

“पहिली बायको म्हणून मला ऑर्डर दिली आहे. बायको नसल्याने पोटगी देऊ नये असे त्यांच्या वकिलाचे म्हणणे होते. पण कोर्टाने मला बायको म्हणून मान्यता दिली आहे. कोर्टाचा निकाल मला मान्य नाही. मी हायकोर्टात जाणार आहे. मला 15 लाख रुपये पोटगी हवी आहे. एक लाख 70 हजार घराचे भाडे आहे. हे भाडे भरले जात नाही. मेंटेनन्स 30 हजार दर महिना आहे. मुलगा बेरोजगार घरात आहे. दोन लाखात काय होणार? एका महिलेचे लढणे खूप मोठे असते. मी गेल्या तीन वर्षापासून एकटी लढत आहे. मी दागिनेही विकले आहेत. बीडहून मुंबईला यायचे आणि तिथून पुन्हा बीडला जायचे. वाल्मिक कराडने मला मारले होते. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता”, असा खळबळजनक खुलासाही करुणा शर्मा यांनी केला आहे.

मी धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार आहे

“मी धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीवर दावा करणार आहे. धनंजय मुंडेची दुसरी पत्नी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली आहे. बेकायदेशीरपणे केली आहे. त्यावरही मी दावा करणार आहे”, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.

“मुंडेंनी दुसरं लग्न करताना माझी परवानगी घेतली नाही”

“मुंडेंनी दुसरं लग्न करताना माझी परवानगी घेतली नव्हती. मला त्याची माहिती नव्हती. मी त्यावेळी इंदोरमध्ये होते”, असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

Previous Post

मोठी बातमी ! सांगोला येथे पिकअप व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू तर 9 महिला व पुरुष ऊसतोडणी कामगार जखमी

Next Post

कशी काळाची चाहूल आली ! ती घरातून निघाली, थोड्यावेळाने मित्राचा फोन आला ‘वहिनी गेली रे’… सांगलीत महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू ; कर्तव्यावर जात असताना काळाचा घाला

Next Post
कशी काळाची चाहूल आली ! ती घरातून निघाली, थोड्यावेळाने मित्राचा फोन आला ‘वहिनी गेली रे’… सांगलीत महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू ; कर्तव्यावर जात असताना काळाचा घाला

कशी काळाची चाहूल आली ! ती घरातून निघाली, थोड्यावेळाने मित्राचा फोन आला 'वहिनी गेली रे'... सांगलीत महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू ; कर्तव्यावर जात असताना काळाचा घाला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group