news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत SPECTRA 2K25 वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न ; प्रा. शोभा काळुंगे, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, डॉ. महेश कोनळळी, डॉ. बिभीषण रणदिवे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
February 5, 2025
in सांस्कृतिक
0
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत SPECTRA 2K25 वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न ; प्रा. शोभा काळुंगे, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, डॉ. महेश कोनळळी, डॉ. बिभीषण रणदिवे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार… स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन… स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा…शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनाची एक वेगळीच ओढ आणि आवड असते. म्हणून सर्वच विद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दिनांक 30 व 31 जानेवारी 2025 रोजी मोठया उत्साहात साजरे झाले. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.

या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन धनश्री महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे यांचेहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे व्हाईस प्रेसिडेंट व सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. महेश कोनळळी, सिद्ध सारणा संघ माचनूरचे सचिव विष्णू कलुबर्मे,

संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या शरदिनी काळे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, स्कूल कॅप्टन अथर्व भोसकर व प्रतीक्षा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली. प्राध्यापक कल्पेश कांबळे व त्यांच्या चिमुकल्या टीमने स्वागत गीताने सर्व अतिथींचे स्वागत केले. सर्व अतिथींचा प्रशालेकडून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी प्रस्तुत केले. दरवर्षी दिला जाणाऱा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार यावर्षी इयत्ता सहावीतील कु. सात्विक नागनाथ जाधव व इयत्ता आठवीतील कु. जिया शाकिर सय्यद यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. नंतर हाऊस चॅम्पियनशिपची घोषणा करण्यात आली.

ग्रीन हाऊसला शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी “चॅम्पियनशिप” ट्रॉफी मिळाली. प्रमुख पाहुण्यांनी ग्रीन हाऊसच्या कर्णधारांचा ट्रॉफी देऊन गौरव केला. शोभाताई काळुंगे व डॉ. बिभीषण रणदिवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रशालेला वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. नंदकुमार शिंदे यांनी प्रशालेची भविष्यात असलेली ध्येय पालकांसमोर व्यक्त केली व विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये विविधता आढळून आली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज थीम, वृद्धाश्रम थीम, हॉरर थीम, शेतकरी थीम, मदर थीम, आसामी लोकनृत्य, बॉलीवूड रिमिक्स, कोळी नृत्य, दक्षिण भारतीय शैली, झोम्बी आणि महाकाली नृत्य, देशभक्तीपर नृत्य, पंजाबी नृत्य आणि गजर माऊलीचा (वारी थीम नृत्य) अशा विविध थीम विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमाला पालकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभला. पालकांनी विद्यार्थ्यांवर व शालेय व्यवस्थापनेवर कौतुकांचा वर्षाव केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे विश्वस्त डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

आज मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन ; पुनम देवदास, प्राचार्य कैलास करांडे, डॉ. नयना पाटील-व्यवहारे, डॉ. सुरेश व्यवहारे, प्राचार्य सुधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

मोठी बातमी ! सांगोला येथे पिकअप व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू तर 9 महिला व पुरुष ऊसतोडणी कामगार जखमी

Next Post
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

मोठी बातमी ! सांगोला येथे पिकअप व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू तर 9 महिला व पुरुष ऊसतोडणी कामगार जखमी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group