टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी सकाळी 10 वाजता मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या वार्षिक बैठकीत माजी अध्यक्ष रामचंद्र वाकडे यांनी नूतन अध्यक्षांची नावे जाहीर केली.
यावेळी गतवर्षीचा जमा खर्चाचा तपशील माजी अध्यक्ष गणेश सावंजी यांनी मांडला व सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा 49 वा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे सर्व जेष्ठ सल्लागार, माजी अध्यक्ष, सल्लागार, पदाधिकारी व शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. माजी अध्यक्ष प्रा. विनायक कलुबर्मे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून आभार मानले. बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांच्या निवडीबद्दल मंगळवेढा शहर व तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.









