news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का, ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार प्रवेश, राज्याच्या राजकारणात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
January 17, 2025
in राजकीय
0
मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का, ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार प्रवेश, राज्याच्या राजकारणात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवारांच्या समर्थकाने त्यांची साथ सोडली आहे. आमदार सतीश चव्हाण आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. उद्या शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत आहे. याच कार्यक्रमामध्ये आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये होते. मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येत आहेत.

चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून महायुतीला घरचा आहेर दिला होता. जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला. तथापि मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही. असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. चव्हाणांच्या या पत्राची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावेळी दखल घेतली होती. त्यांनी पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याचे तटकरे यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले होते.

त्यानंतर त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा आमदार सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होत आहे. त्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सतीश चव्हाण यांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Previous Post

धक्कादायक ! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोघांना अटक, पालकांमध्ये संतापाचे वातावरण, शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर

Next Post

आजचा शुक्रवार अपघातवार ! आज राज्यात झालेल्या 2 विचित्र अपघातांमध्ये 12 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती ; कुठे झाल्या या दुर्घटना?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group