टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावच्या हद्दीत टॉवेल कंपनी शेजारी आज सकाळी या अपघाताची घटना घडली आहे.
महामार्ग पोलीस मदत केंद्र डाळज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अल्लाबक्सर मोहंमद अली यांचा मृत्यू झाला असून कासीम मुल्ला, मोहंमद हुसेन, शमिता हुंचल, हुसेनबीन बहिरोद्री,शाबाई हुंचल हे सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी प्रवासी कोची कोटा विजापूर येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग मदत केंद्रातील पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.










