टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विद्या विकास मंडळ संचालित श्री संत दामाजी महाविद्यालयात रेझिंग डे सप्ताहानिमित्त स्नेहल चव्हाण यांनी समाजाच्या सुरक्षिततेसाठी वातावरण निर्माण करणे या विषयावरती समुपदेशन करून मार्गदर्शन केले.
यावेळी निर्भया पथकाच्या प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आपल्या परिसरातील स्त्रिया, जेष्ठ नागरिक, मुले, अल्पसंख्यांक व दुर्बल घटकासाठी समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे हे पोलिसांच्या निर्भयापथका समवेत सर्वच घटकातील लोंकाचे काम आहे. विदयार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर चुकीचा करु नये. कोणी आपला पाठलाग करीत असेल तर ही गोष्ट न लपवता शिक्षकांना किंवा पोलीस प्रशासनाला सांगितले पाहिजे. आपल्या हातून काही चूक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अल्पवयीन मुली नको त्या अमिषाला बळी पडतात आणि आयुष्य खराब करून घेतात. ही खूपच गंभीर बाब आहे. भारतीय न्याय संहिता कायदा समजावून घेणे आवश्यक आहे. आवांतर वाचन करून स्पर्धा परीक्षा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे व्हा. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अमोल राऊत म्हणाले, रेझिंग डे अभियानाचा उद्देशच हा आहे की मुलांना कायद्याची जाणीव निर्माण करून देऊन समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोषक वातावरण निर्माण करणे. बालसुरक्षा कायदा सर्व मुलामुलींना लागू पडतो. महाविद्यालयीन जीवनात आपले पाऊल वाकडे पडणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस निर्भया पथक सदैव आपल्या सोबत आहे असे सांगितले.
यावेळी उपप्राचार्य प्रा राजेंद्र गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ जगताप, पोलीस स्टेशनचे अमोल कुंभार, कविता सावंत, सोनाली जुंदळे, प्रा. शारदा गाडेकर, प्रा. निर्मला सावंत, प्रा. अश्विनी रहाणे, प्रा. कविता क्षीरसागर, प्रा. धनाजी गवळी यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.









