news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भीषण अपघात ! पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू तर अनेक प्रवासी गंभीर जखमी

टीम लोकमन by टीम लोकमन
December 29, 2024
in ताज्या घडामोडी
0
भीषण अपघात ! पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू तर अनेक प्रवासी गंभीर जखमी

टीम लोकमन पंढरपूर |

पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीत पंढरपूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहा ते आठ भाविक जखमी झाले आहेत.

जखमी भाविकांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत. अशी प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावरील पंढरपूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भटुंबरे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हभप तुकाराम खेडलेकर महाराज मठाच्या समोर हा भीषण अपघात झाला आहे. टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांची बसची पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही वाहनांचा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचे वृत्त समजतात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Previous Post

कौतुकास्पद ! उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रिजनल अबॅकस स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश ; नॅशनल अबॅकस स्पर्धेसाठी निवड

Next Post

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये, रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे दिले निर्देश ; राज्यातील राजकारण तापणार?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group