news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

करा जल्लोष ! थर्टी फर्स्टला तळीरामांची होणार चांदी, पहाटेपर्यंत मिळणार दारू ; नववर्षाचे स्वागत करणाऱ्या उत्साही लोकांच्या आनंदात भर, शासनाचा नवा आदेश नेमका काय आहे?

टीम लोकमन by टीम लोकमन
December 23, 2024
in ताज्या घडामोडी
0
करा जल्लोष ! थर्टी फर्स्टला तळीरामांची होणार चांदी, पहाटेपर्यंत मिळणार दारू ; नववर्षाचे स्वागत करणाऱ्या उत्साही लोकांच्या आनंदात भर, शासनाचा नवा आदेश नेमका काय आहे?

टीम लोकमन मंगळवेढा |

येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. पार्टीचाही बेत असतोच. लाखो लिटर दारू अन् बिअर रिचवली जाते. असा सगळा रागरंग असतो. या जल्लोषात आता सरकारी आदेशाची भर पडली आहे. अर्थातच हा आदेश तळीरामांच्या आनंदात भर घालणारा आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. थर्टी फर्स्टला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही मोठ्या प्रमाणात नियोजन केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. या काळात मद्य आणि बिअरला सर्वाधिक मागणी वाढलेली असते. हॉटेल्स, पबमधील पार्ट्याही रंगतदार असतात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून आता सरकारनेही वेळेत बदल केला आहे. 24,25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बिअर/वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे. FLBR-II परवानाधारकांसाठी याच पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने राज्यातील दारू दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागानेच याबाबत आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. दारुची दुकाने रात्री 1 वाजपेर्यंत तर पब आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतोच. या काळात कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. आता तर सरकारनेच पहाटेपर्यंत दारू विक्रीची परवानगी दिल्याने पोलिसांवर असणारा कामाचा ताण आता अधिकच वाढणार आहे.

Previous Post

मोठी बातमी ! ….तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार? नितीश कुमार अस्वस्थ, मोदींची साथ सोडून एनडीएतून बाहेर पडणार? नितीश कुमारांच्या गोटात हालचालींना वेग

Next Post

मोठी बातमी ! विद्येच्या माहेरघरात रात्रीच्या वेळी डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू ; हृदयद्रावक घटनेने पुण्यनगरी हादरली

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! विद्येच्या माहेरघरात रात्रीच्या वेळी डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू ; हृदयद्रावक घटनेने पुण्यनगरी हादरली

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group