टीम लोकमन सोलापूर |
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने आज सोलापुरात पदनिर्वाचित प्रेसिडेंट, सेक्रेटरी व असिस्टंट गव्हर्नर यांचेसाठी INSPIRE Pre PELS & Pre SELS 2025-26 हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या कार्यक्रमाचे फोरम लीडर रो. रविंद्र बनकर व कॉन्व्हेनर रो. अतुल चव्हाण यांनी दिली.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे रोटरी वर्ष 2025-26 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे इलेक्ट प्रेसिडेंट, सेक्रेटरी व असिस्टंट गव्हर्नर यांच्यासाठी लर्निंग सेमिनार सोलापूर येथील दमानी ब्लड बँक येथील सभागृहात रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.30 या वेळेत होणार आहे.
रोटरी लीडर्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2026-27 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेशभाई पटेल, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2025-26 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातुरे, तसेच पीडीजी रो. मोहन देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील रोटरी क्लबचे पदनिर्वाचित प्रेसिडेंट सेक्रेटरी व असिस्टंट गव्हर्नर यांचेसाठी हा लर्निंग सेमिनार अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या सेमिनारमध्ये नेतृत्व कौशल्य, रोटरीची पुढील वर्षाची दिशा समजून घेण्याची संधी रोटरी लीडर्सना मिळणार आहे. या लर्निंग सेमिनारच्या संयोजनाची जबाबदारी रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड या क्लबला देण्यात आली आहे. या क्लबचे रो. श्रीरंग क्षीरसागर हे प्रेसिडेंट असून रो. सूर्यकांत आगवणे हे सेक्रेटरी आहेत.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या रोटरी वर्ष 2025-26 च्या फर्स्ट लेडी सौ संगीता सुधीर लातुरे यांच्या संकल्पनेतून ॲन्ससाठी सुद्धा याच वेळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध खेळ घेण्यात येणार असून त्यामधील विजेत्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी ॲन्ससाठी महाराष्ट्राच्या परंपरेचे व संस्कृतीचे प्रतीक असलेले तसेच मराठमोळ्या प्रत्येक महिलेला आवडणारी एक खास भेटवस्तू दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त ॲन्सनी या कौटुंबिक आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सौ. संगीता सुधीर लातुरे यांनी केले आहे.









