news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! पंढरपुरात तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना ठोकल्या बेड्या, पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई ; बनावट नोटांचा पर्दाफाश झाल्याने पंढरपुरात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
December 7, 2024
in क्राईम
0
मोठी बातमी ! पंढरपुरात तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना ठोकल्या बेड्या, पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई ; बनावट नोटांचा पर्दाफाश झाल्याने पंढरपुरात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत राज्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड भरारी पथकाला सापडले होते. महिनाभरात 600 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता पोलिसांकडून त्यावेळी जप्त करण्यात आली होती.

आता विधानसभा निवडणुका संपताच पंढरपूरमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश झाला असून तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील मधुकर माने यांना एजंटकडून गाई गोठ्याचे 10 लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते.

500 रुपयांच्या नोटा घेऊन मधुकर माने बँकेत गेले होते. त्यावेळी त्या सर्व नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत मधुकर माने यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोघांना अटक केली. पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत असून यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येईलच. पण इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा मिळाल्यामुळे पंढरपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर शहरात पोलिसांना तब्बल 10 लाख 14 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी बावनट नोटांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंढपुरात यापूर्वीही असे अनेक प्रकरण घडले आहेत. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने नोटांच्या प्रकरणांचा तपास करत भामट्यांचा पर्दाफाश केला आहे.

पंढरपुरात पोलिसांनी बानवट नोटांचे मोठे रॅकेट उघड केले आहे. मधुकर माने यांना बनावट नोटा देऊन आरोपींनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. कारवाईमध्ये पंढरपूर शहर पोलिसांनी तब्बल 10 लाख 14 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात शासकीय योजना मंजूर करुन देणारे खासगी एजंट राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पंढरपूर शहर पोलिसांनी बावनट नोटांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Previous Post

मोठी बातमी ! कार व मळणी यंत्र वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार ; मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना काळाचा घाला

Next Post

सरकार स्थापन होऊन 48 तास होताच महायुतीत मतभिन्नता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांचा विरोध, फडणवीस मात्र निर्णयावर ठाम ; ‘हा’ विषय ठरतोय कळीचा मुद्दा

सरकार स्थापन होऊन 48 तास होताच महायुतीत मतभिन्नता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांचा विरोध, फडणवीस मात्र निर्णयावर ठाम ; 'हा' विषय ठरतोय कळीचा मुद्दा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group