news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना दिल्लीत मिळाले मानाचे पान ; शरद पवारांना दिल्लीत मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

टीम लोकमन by टीम लोकमन
December 3, 2024
in ताज्या घडामोडी
0
मोठी बातमी ! सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, जिल्ह्यातील मोठा नेता शरद पवारांच्या गळाला ? ‘हा’ मोठा नेता आपल्या कळपात घेऊन पवार ठाकरेंना देणार धक्का?

टीम लोकमन मंगळवेढा |

संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर येत असून सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री, जेष्ठ नेते शरद पवार यांची या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जवळपास 70 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्ली मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु होते उद्घाटक

यापूर्वी 1954 साली दिल्लीत 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नव्हते.

दिल्लीतील या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देखील निमंत्रितांमध्ये आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे सहकार्यही या संमेलनाला लाभले आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते. मात्र त्यावेळी ते होऊ शकले नाहीत. पण राजधानी दिल्लीत होणाऱ्या पहिल्या साहित्य संमेलनाला साहित्यिक राजकीय सामाजिक अभ्यास असणारा माणूस रहावा म्हणून सरहद संस्थेने शरद पवारांना विनंती केली होती. या विनंतीला मान देत शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारले असल्याची माहिती समोर येत आहे.

Previous Post

धक्कादायक ! ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात ऊसतोड कामगाराच्या तीन बालकांचा दुर्दैवी अंत ; मन सुन्न करणाऱ्या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला

Next Post

मोठी बातमी ! जगप्रसिद्ध ऐतिहासिक ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी ; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल, ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group