टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ शिवाजी तालीम परिसरातील रहिवासी व मंगळवेढा नगरपालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक शंकर कुशाबा जाधव यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्युसमयी ते 85 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कुमार जाधव, चालक दत्तात्रय जाधव, मंगळवेढा तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांचे ते वडील तर मरवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी राखी जाधव यांचे ते सासरे होत.







