news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भीषण अपघात ! राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार तर अनेक प्रवासी गंभीर जखमी ; अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

टीम लोकमन by टीम लोकमन
November 29, 2024
in क्राईम
0
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्र राज्यातील एसटी बस अपघाताची गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवशाही बस उलटून जवळपास 7 ते 8 प्रवासी ठार झाले आहेत. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अपघातासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी, गोंदिया येथे बस उलटल्यानंतर आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे जात होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील 11 प्रवाशांना मृत्यू झाला तर 29 प्रवासी जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील रहिवाशांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. 108 रुग्णवाहिका बोलावून जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्यास सुरुवात केली आहे. जखमी व मृत प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

Previous Post

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुरस्कार जाहीर ; प्रा. डॉ. राजकुमार पवार, श्रीकांत मेलगे, जयराम आलदर, प्रकाश पाटील, मनोज वेदपाठक, राजाराम दत्तू, अर्चना सलगर यांचेसह अनेक शिक्षक व शाळाही होणार पुरस्काराने सन्मानित

Next Post

मी पुन्हा येतोय ! एकदाचं ठरल…पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री ; 5 डिसेंबरला होणार शपथविधी, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या पदरात काय पडणार अजूनही गुलदस्त्यातच

Next Post
मी पुन्हा येतोय ! एकदाचं ठरल…पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री ; 5 डिसेंबरला होणार शपथविधी, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या पदरात काय पडणार अजूनही गुलदस्त्यातच

मी पुन्हा येतोय ! एकदाचं ठरल...पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री ; 5 डिसेंबरला होणार शपथविधी, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या पदरात काय पडणार अजूनही गुलदस्त्यातच

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group